...आणि सुनील गावस्कर भडकले

टीम इंडिया सध्या विजयी रथावर स्वार आहे. प्रत्येक मॅचमध्ये विराट आणि त्याची टीम नवे रेकॉर्ड्स आपल्या नावावर करत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 8, 2017, 07:20 PM IST
...आणि सुनील गावस्कर भडकले title=
File Photo

नवी दिल्ली : टीम इंडिया सध्या विजयी रथावर स्वार आहे. प्रत्येक मॅचमध्ये विराट आणि त्याची टीम नवे रेकॉर्ड्स आपल्या नावावर करत आहे.

श्रीलंकेला पराभवाची धूळ

श्रीलंकेला टेस्ट सीरिजमध्ये पराभवाची धूळ चारत टीम इंडियाने एका नव्या रेकॉर्डची बरोबरी केली. टीम इंडियाची ही सलग ९वी सीरिज आपल्या नावावर केली आहे. यासोबतच टीम इंडियाने आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसोबत बरोबरी केली आहे.

गावस्करांनी केली टीका

टीम इंडियाच्या प्रत्येक प्लेअरचं प्रदर्शन जबरदस्त आहे. मात्र, असं असतानाच जर कुणी टीम इंडियाच्या प्लेअर्सवर्सवर टीका केली तर?...

फिल्डिंगवरुन केली टीका 

सुनील गावस्करने टीम इंडियाच्या दोन प्लेअर्सवर  आपला राग व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले आहेत. माजी कॅप्टन सुनील गावस्करने टीम इंडियाच्या दोन प्लेअर्सवर फिल्डिंगवरुन टीका केली आहे.

पाहा कोण आहेत हे प्लेअर्स

सुनील गावस्करने टीम इंडियाच्या ज्या दोन प्लेअर्सवर टीका केली आहे त्यामध्ये यंदाच्या वर्षी सर्वाधिक टेस्ट रन्स बनवणाऱ्यांच्या यादीत असलेला चेतेश्वर पुजारा आणि टेस्ट क्रिकेटमध्ये वेगाने ३०० विकेट्स घेणाऱ्या आर अश्विन यांचा समावेश आहे.

सुनील गावस्करने या दोन प्लेअर्सच्या फिल्डिंगवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये ज्यावेळी पुजारा बाऊंड्रीवर बॉल थांबवण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी कमेंट्री बॉक्समधून गावस्करांनी म्हटलं की, "असं वाटत आहे की, हँडब्रेक ऑन आहे आणि कार सुरु आहे". इतकचं नाही तर, गावस्करांनी आर. अश्विनवरही टीका करत म्हटलं की, मला जास्त प्रोग्रेस होताना दिसत नाहीये.

तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये एकवेळ अशी आली होती की, टीम इंडिया सहजपणे मॅच जिंकेल. मात्र, श्रीलंकन बॅट्समन खासकरुन धनंजय सिल्वा आणि रोशल सिल्वाने भारताच्या स्वप्नांवर पाणी फेरले. त्यामुळे अखेर मॅच ड्रॉ झाली. धनंजय सिल्वाने नॉट आऊट ११९ रन्सची इनिंग खेळली. तर, रोशन सिल्वाने नॉट आऊट ७० रन्सची इनिंग खेळली.