Suniel Shetty On KL Rahul: मॅचविनर जावई पुन्हा फेल; पण सासरेबुवा म्हणतात...

KL Rahul father in law: केएल राहुलच्या 75 धावांच्या खेळीने भारताला विजय मिळवून दिल्यानंतर सुनील शेट्टीला याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा सुनिल शेट्टी (Suniel Shetty On KL Rahul) म्हणतात...

Updated: Mar 19, 2023, 04:09 PM IST
Suniel Shetty On KL Rahul: मॅचविनर जावई पुन्हा फेल; पण सासरेबुवा म्हणतात... title=
Suniel Shetty,KL Rahul

India vs Australia: वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात (IND vs AUS) सर्व खेळाडू बाद होत असताना स्टार केएल राहूलने (KL Rahul) एकबाजू सांभाळून ठेवली आणि टीम इंडियाच्या विजयाची दारं उघडली. पहिल्या वनडेमध्ये केएल राहुलने 75 धावांची नाबाद खेळी करत टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं. त्यामुळे भारताला विजयी आघाडी मिळवता आली आहे. (Suniel Shetty On KL Rahul after India vs Australia match winning innings father in law gave reply to the critics latest sports news)

राहुलच्या (KL Rahul) या खेळीने त्याच्या टीकाकारांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, सध्या सुरू असलेल्या सामन्यात राहुलने पुन्हा तीच चूक केली आणि आता पुन्हा त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. अशातच आता केएल राहूलचे सासरेबुवा आणि स्टार बॉलिवूड कलाकार सुनिल शेट्टी (Suniel Shetty) यांनी जावयाच्या खेळीवर मोठं वक्तव्य केलंय.

आणखी वाचा - India vs Australia: टीम इंडियाला लागलं 'सूर्या'ग्रहण; टी-ट्वेंटीचा शेर वनडेत फेल!

टीम इंडियाला विजय मिळवून देणाऱ्या केएल राहुलचे कुटुंबीयही आनंदी दिसत होतं. या संदर्भात बोलताना अभिनेता लोकेश राहुल सासरे म्हणजेच सुनील शेट्टी यांनी टीकाकारांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले Suniel Shetty?

केएल राहुलच्या 75 धावांच्या खेळीने भारताला विजय मिळवून दिल्यानंतर सुनील शेट्टीला याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा सुनिल शेट्टी (Suniel Shetty On KL Rahul) म्हणतात "सर्व काही देवाच्या हातात आहे. वरचा देव सर्वकाही करून घेतो. बाकी जग काय म्हणते त्यानं काही फरक पडत नाही."

पाहा VIDEO-

स्टार्कसमोर फलंदाजांनी टाकली नांगी

मिचेल स्टार्कच्या घातक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. रोहित शर्मा (Rohit Sharma), शुभमन गिल (Shubman Gill), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि केएल राहुल (KL Rahul) फेल झालेत. या सामन्यात स्टार्कने 5 विकेट घेतले. वनडेमध्ये 5 विकेट घेण्याची नव्यांदा कामगिरी स्टार्कने केली आहे.