भारताविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी श्रीलंकेच्या टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी श्रीलंकेच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Updated: Jan 1, 2020, 10:03 PM IST
भारताविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी श्रीलंकेच्या टीमची घोषणा title=

कोलंबो : भारताविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी श्रीलंकेच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. ५ जानेवारीपासून ३ टी-२० मॅचच्या या सीरिजला सुरुवात होणार आहे. श्रीलंकेच्या टीममध्ये एंजलो मॅथ्यूजने पुनरागमन केलं आहे. मागची २ वर्ष दुखापतीमुळे त्रस्त असलेला मॅथ्यूज ऑगस्ट २०१८ नंतर एकही टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळला नाही.

श्रीलंकेचा फास्ट बॉलर नुवान प्रदीप याला सराव करताना दुखापत झाली, त्यामुळे त्याला टीममध्ये स्थान मिळालं नाही. प्रदीपऐवजी २६ वर्षांच्या कसुन रजिथाला संधी देण्यात आली आहे.

श्रीलंकेच्या टीमचं नेतृत्व लसिथ मलिंगाकडे देण्यात आलं आहे. गुरुवारी श्रीलंकेची टीम भारतात दाखल होणार आहे. ५ जानेवारीला गुवाहाटी, ७ जानेवारीला इंदूर आणि १० जानेवारीला पुण्यामध्ये टी-२० मॅच खेळवल्या जाणार आहेत.

या टी-२० सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा आधीच करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीला या सीरिजमधून विश्रांती देण्यात आली आहे. तर जसप्रीत बुमराहचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.

श्रीलंकेची टीम

लसिथ मलिंगा, दनुष्का गुणतिलका, आविष्का फर्नांडो, एंजलो मॅथ्यूज, दसुन शनाका, कुसल जानीथ परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डिसिल्व्हा, इसरू उडाना, भनुका राजपक्षा, ओशाडा फर्नांडो, वानीडू हसरंगा, लहिरु कुमारा, कुसल मेंडिस, लक्षण संडकन

श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० साठी भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन