श्रीलंकेच्या खेळाडूने सर्वात जलद बॉल टाकण्याचा विक्रम केला? पाहा काय आहे सत्य

क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद बॉल टाकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शोएब अख्तरच्या नावावर आहे.

Updated: Jan 21, 2020, 06:04 PM IST
श्रीलंकेच्या खेळाडूने सर्वात जलद बॉल टाकण्याचा विक्रम केला? पाहा काय आहे सत्य title=

ब्लॉमफाऊंटन : क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद बॉल टाकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शोएब अख्तरच्या नावावर आहे. शोएब अख्तरचा हा विक्रम रविवारी अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये तुटल्याचं सांगण्यात आलं, पण याबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात रविवारी अंडर-१९ वर्ल्ड कपची मॅच झाली. या मॅचमध्ये श्रीलंकेच्या माथिसा पाथिराना या बॉलरने यशस्वी जयस्वालला बॉल टाकला. हा बॉल १७५ किमी प्रती तास या वेगाने टाकल्याचं दाखवण्यात आलं.

माथिसा पाथिराना याने टाकलेला हा बॉल वाईड होता, पण मशिनमध्ये चूक झाल्यामुळे हा बॉल १७५ किमी प्रती तास या वेगाचा असल्याचं दिसलं. त्यामुळे पाथिरानाने क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद बॉल न टाकल्याचं यानंतर स्पष्ट झालं.

virat

शोएब अख्तरने २००३ वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध १६१.३ किमी प्रती तास या वेगाने बॉल टाकला होता. क्रिकेट इतिहासात अजूनही हा सगळ्यात जलद बॉल आहे. ऑस्ट्रेलियाचे ब्रेट ली आणि शॉन टेट यांनी अख्तरचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला. हे दोन्ही बॉलर शोएब अख्तरच्या विक्रमाजवळ पोहोचले, पण त्यांना हा विक्रम मोडता आला नाही.

१७ वर्षांचा माथिसा पाथिराना याआधी सप्टेंबर २०१९ साली चर्चेत आला होता. कॉलेज स्पर्धेमध्ये पाथिरानाने फक्त ७ रन देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. पाथिरानाची बॉलिंग एक्शन श्रीलंकेचा दिग्गज बॉलर लसिथ मलिंगाशी मिळती जुळती आहे.