ड्रेसिंग रूममध्ये जाऊन फॅननं अजिंक्य रहाणेला केलं किस

क्रिकेटच्या दुनियेत ड्रेसिंग रूममध्ये अनेक गुपितं दडलेली असतात. 

Updated: Jul 18, 2017, 11:12 PM IST
ड्रेसिंग रूममध्ये जाऊन फॅननं अजिंक्य रहाणेला केलं किस  title=

मुंबई : क्रिकेटच्या दुनियेत ड्रेसिंग रूममध्ये अनेक गुपितं दडलेली असतात. याच ड्रेसिंग रूममध्ये विरोधी टीमला हरवण्यासाठीची रणनिती ठरवली जाते. कधी विजयाचं सेलिब्रेशन होतं तर कधी पराभवाची कारणमिमांसा होते. ड्रेसिंग रूममधले यातले काही क्षण खेळाडू नेहमीच लक्षात ठेवतात.

रोहित शर्मानं असाच ड्रेसिंग रूममधला किस्सा विक्रम साठेच्या ‘What the Duck Season 2’मध्ये सांगितलं आहे. २०१५मध्ये भारताच्या श्रीलंका दौऱ्यावेळी झालेल्या या घटनेमध्ये एका फॅननं ड्रेसिंग रूममध्ये जाऊन अजिंक्य रहाणेला किस केलं. पर्सी अंकल अस या क्रिकेट फॅनचं नाव आहे. श्रीलंकेत होणाऱ्या अनेक क्रिकेट मॅचवेळी पर्सी अंकल स्टेडियममध्ये हजर असतात.

पर्सी अंकलनं अजिंक्य रहाणेला किस केल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. रोहित शर्मानं अजिंक्य रहाणेबद्दलचा हा किस्सा सांगितल्यामुळे पुन्हा एकदा हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. सुजन राव नावाच्या यूजरनं हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला आहे. 

क्रिकेट फॅननं अजिंक्य रहाणेला केलं किस