लग्न न करण्याचा पाढा वाचणाऱ्या मुरलीधरन यांची 10 मिनिटांत या तरुणीनं काढली विकेट

मुरली मुथैय्या लग्नासाठी बोहल्यावर चढण्यासाठी एकेकाळी खूप घाबरायचे. त्यांच्या मनात कायम भीती असायची. मात्र एका तरुणीला पाहून मुथैय्याच चक्क क्लिन बोल्ड झाले.

Updated: May 20, 2021, 12:00 PM IST
लग्न न करण्याचा पाढा वाचणाऱ्या मुरलीधरन यांची 10 मिनिटांत या तरुणीनं काढली विकेट title=

मुंबई: क्रिकेट विश्वात जर कुणाला फलंदाज घाबरत असतील तर ते मुरली मुथैय्या यांच्या गोलंदाजीला. त्यांची गोलंदाजी करताना अॅक्शन पाहून भल्याभल्यांना घाम फुटायचा आणि दांडी गुल व्हायची. पण मुरली मुथैय्या लग्नासाठी बोहल्यावर चढण्यासाठी एकेकाळी खूप घाबरायचे. त्यांच्या मनात कायम भीती असायची. मात्र एका तरुणीला पाहून मुथैय्याच चक्क क्लिन बोल्ड झाले. लग्नाला तयार झाले. 

मुथय्या यांची लव्हस्टोरी सिनेमापेक्षा कमी नाही. श्रीलंकेचा माजी गोलंदाज मुरलीधरन मुथैय्या यांच्या लग्नाविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांची लव्हस्टोरी सिनेमासारखीच रंजक आहे. 

एकदा मुरलीधरन एका मुलाखतीसाठी एका चॅनलच्या स्टुडियोमध्ये गेले होते. तिथे अभिनेता चंद्रशेखर देखील उपस्थित होते. त्यांची एकमेकांशी खूप चांगली मैत्री झाली. त्यानंतर दोघांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं वाढलं. एकदा मुरलीधरन यांच्या आईने चंद्रशेखर यांना सांगितलं की त्या आपल्या मुलाला लग्नासाठी मुलगी शोधत आहेत. 

चंद्रशेखर यांनी मधिमलार रामामूर्ती नावाच्या मुलीला त्यांनी पाहावं असा हट्ट धरला. मधिमलार यांचे वडील चंद्रशेखर यांचे खास मित्र होते. मधिमलार यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मधिमलार यांच्या विवाहासाठी सुयोग्य स्थळ शोधणं सुरू होतं. दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांना भेटायचंही ठरलं मात्र मुरलीधरन यांना हे सगळं त्यावेळी मान्य नव्हतं. त्यांची नकारघंटा सुरू होती. 

रोहित शर्मा पहिल्याच भेटीत अभिनेत्रीच्या एवढा जवळ आला, तरी का लपवतो तो हे अफेयर?

मुरलीधरन यांनी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला नकार दिला. आपल्या करियरमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी आधीच भीतीनं नकार कळवून दिला. त्यानंतर सर्वांनी त्यांची समजूत घातली तेव्हा कुठे घरच्यांच्या आग्रहाखातर मुरलीधरन तयार झाले. 

2004 मध्ये पहिल्यांदा मुरलीधरन आणि मधिमलार भेटण्यासाठी चेन्नईमध्ये पोहोचले. त्यावेळी मधिमलार यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं. दोघांनाही भेटण्यासाठी कुटुंबाने 10 मिनिटांचा वेळ दिला. या 10 मिनिटांनी मुरलीधरन यांचं अख्ख आयुष्य बदललं. त्यांनी लग्नासाठी होकार कळवला.

बालपण सर्वांचं सारखंच असतं! ईशांत शर्माला पण खायला लागले होते फटके

पहिल्या भेटीमध्ये मधिमलार त्यांना खूपच हसतमुख आणि खोडकर वाटल्या. प्रत्येक गोष्टीकडे तिचा बघण्याचा दृष्टीकोन आणि प्रत्येक गोष्टीत मजा-मस्करी करणारी ही तरुणी त्यांना 10 मिनिटांतच खूप आवडली होती. दोन्ही कुटुंब खूप खूश होते. 

हजारो रुपये बिल येईपर्यंत दोघंही फोनवर बोलायचे. 21 मार्च 2005मध्ये मुरलीधरन आणि मधिमलार यांनी विवाह केला. क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी या लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती. अनेकांची दांडी गुल करणाऱ्या मुरलीधरन यांची दांडी अवघ्या 10 मिनिटांत मधिमलार यांनी गुल केली होती.