SL vs IND ODI : रोहित-विराट विरुद्ध श्रीलंकेचा मास्टरप्लॅन; वनडेसाठी संघ जाहीर, 'या' खेळाडूंना संधी

Sri Lanka ODI squad Announced : तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 16 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. चरिथ असलंका श्रीलंकेचा कॅप्टन असेल.

सौरभ तळेकर | Updated: Jul 30, 2024, 07:49 PM IST
SL vs IND ODI : रोहित-विराट विरुद्ध श्रीलंकेचा मास्टरप्लॅन; वनडेसाठी संघ जाहीर, 'या' खेळाडूंना संधी title=
Sri Lanka ODI squad Announced

India vs Sri lanka ODI squad : टी-ट्वेंटी मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. टीम इंडियासाठी आनंदाची बातमी म्हणजे, रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा मैदानात खेळताना दिसतील. अशातच आता अखेरच्या टी-ट्वेंटी सामन्याआधी श्रीलंकेने वनडे संघ जाहीर केला आहे. चरिथ असलंका श्रीलंकेचा एकदिवसीय संघाचा कॅप्टन असेल. तर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 16 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. 

क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री हरिन फर्नांडो यांनी या स्कॉडला मान्यता दिली, अशी माहिती क्रिकेट बोर्डाने दिली आहे. श्रीलंका क्रिकेट निवड समितीने 16 खेळाडूंच्या नावाचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर आता शिक्कामोर्बत झालं आहे.

श्रीलंकेचा वनडे संघ - चरिथ असलंका (कर्णधार), पथूम निसंका, अविष्का फर्नांडो, कुशल मेंडिस, सदीरा समराविक्रमा, कमिंदू मेंडिस, जनिथ लियानागे, निशान, वनिंदू हसरंगा, दुमिथ वेल्लालागे, चमिका करुणारत्ने, महीष थिक्षणा, अकिला धनंजया, दिलशान मदुशंका, मथिशा पथिराणा, असिथा फर्नांडो.

भारताचा वनडे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (विकेटकीपर), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग , अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.