झिम्बाब्वेचा भारत दौरा रद्द; आता ही टीम येणार

झिम्बाब्वे क्रिकेट टीमचा भारत दौरा रद्द करण्यात आला आहे.

Updated: Sep 26, 2019, 08:16 AM IST
झिम्बाब्वेचा भारत दौरा रद्द; आता ही टीम येणार title=

मुंबई : झिम्बाब्वे क्रिकेट टीमचा भारत दौरा रद्द करण्यात आला आहे. आयसीसीने काहीच दिवसांपूर्वी झिम्बाब्वेवर बंदी घातली असल्यामुळे ही सीरिज आता होऊ शकणार नाही. त्यामुळे आता झिम्बाब्वेऐवजी श्रीलंकेची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. ५ जानेवारी ते १० जानेवारीदरम्यान भारत आणि श्रीलंकेमध्ये ३ टी-२० मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. ५ जानेवारीला पहिली टी-२० गुवाहाटीला, दुसरी टी-२० ७ जानेवारीला इंदूरमध्ये आणि १० जानेवारीला पुण्यात मॅच खेळवली जाईल.

झिम्बाब्वेचा भारत दौरा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला दौऱ्याची विनंती केली. श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही याला मंजुरी दिली. श्रीलंकेची टीम ही सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात श्रीलंका ३ वनडे मॅच आणि ३ टी-२० मॅचची सीरिज खेळणार आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव या दौऱ्यातून श्रीलंकेच्या १० प्रमुख खेळाडूंनी माघार घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेची टीम ही सध्या भारत दौऱ्यावर आहे. टी-२० सीरिज संपल्यानंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेत ३ टेस्ट मॅचची सीरिज खेळवण्यात येणार आहे. यानंतर बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज भारत दौऱ्यावर येणार आहेत.