England vs Sri Lanka 3rd Test : श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात खेळवलेल्या गेलेल्या कसोटी मालिकेच्या अखेरच्या सामन्यात पाहुण्या श्रीलंका संघाने इंग्लंडला जोर का झटका (Sri Lanka beat England) दिला. अखेरच्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. श्रीलंकेचा फलंदाज पथुम निसांका याने इंग्लंडच्या गोलंदाजांची कंबर मोडली. श्रीलंकेला मोठ्या खेळीची अपेक्षा असताना निसांकाने 127 धावा कोरल्या अन् श्रीलंकेला इतिहासीक विजय मिळवून दिला. 10 वर्षानंतर इंग्लंडने श्रीलंकेकडून पराभव स्विकारला आहे, पण श्रीलंकेने इंग्लंडला आणखी एक जखम दिलीये.
WTC फायनल गाठण्याचं इंग्लंडचं स्वप्न भंगणार?
पहिल्या दोन कसोटीनंतर इंग्लंड डब्ल्यूटीसी रँकिंगमध्ये (WTC Ranking) मोठी झेप घेईल, अशी शक्यता होती. मात्र, अखेरच्या सामन्यात पराभव पत्कारावा लागल्याने इंग्लंडची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या गुणतालिकेत पाचव्यावरून सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. इंग्लंडने या स्पर्धेसाठी सर्वाधिक म्हणजेच 16 सामने खेळले आहेत. त्यामध्ये इंग्लंडने 8 सामन्यात विजय मिळवलाय, तर 7 सामन्यात त्यांचा पराभव झालाय. तसेच 1 सामना अनिर्णयित राहिला. त्यामुळेच अखेरच्या निकालानंतर 42.19 विजयी टक्केवारीने सहाव्या क्रमांकावर इंग्लंडनची घरगुंडी झालीये.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेतील इंग्लंडच्या अजूनही दोन मालिका बाकी आहेत. इंग्लंड दुबळ्या पाकिस्तानसमोर मालिका खेळवेल तर त्यानंतर तगड्या न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडला दोन हात करावे लागणार आहे. त्यामुळे आता इंग्लंडला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फानयलमध्ये पोहोचायचं असेल तर सर्व सामने जिंकावे लागतील. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया सिरीजवर देखील इंग्लंडचं भवितव्य अवलंबून असणार आहे. इं
ग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ऑली स्टोन, जोश हल आणि शोएब बशीर.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चांदीमल, कामिंडु मेंडिस, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन रथनायके आणि विश्वा फर्नांडो.