कोलंबो : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असा पराभव पत्करल्यानंतर श्रीलंकेचा संघ वनडे मालिकेसाठी जोरदार तयारी करतोय. यातच श्रीलंका क्रिकेट संघाच्या मॅनेजरने असे काही विधान केलेय जे ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
भारताविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीनंतर श्रीलंकेच्या ड्रेसिंग रुममध्ये बिस्कीटांवर बंदी घालण्यात आल्याचे असंका गुरुसिंहा यांनी सांगितले.
द डेली ऑबजर्वरला दिलेल्या मुलाखतीत गुरुसिंहा यांनी ही माहिती दिली. क्रिकेटरर्सच्या खाण्यापिण्याची जबाबदारी फिजीओ तसेच ट्रेनर यांची असते आणि त्यांना चेंजिंग रुममध्ये बिस्कीट खाण्यावर बंदी घातलीये, असे गुरुसिंहा म्हणाले.
गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकन क्रिकेटर्सच्या फिटनेसवर सातत्याने सवाल उपस्थित केले जातायत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षणामुळे श्रीलंकेला हार पत्करावी लागली होती. त्यानंतर श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांनी क्रिकेटर्सच्या फिटनेसवर सवाल उपस्थित केले होते.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा बोर्डाने क्रिकेटर्सच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसतेय.