मुंबई : आयपीएलच्या पदार्पणाच्या सिझनमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या गुजरात टीमने चमकदार कामगिरी केली. यावेळी अनेकवेळच्या चॅम्पियन टीम्सना पराभूत करत गुजरातने जेतेपद जिंकलं. गुजरातच्या या धमाकेदार विजयानंतर हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्याने इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्याचं कौतुक केलंय
कृणाल पंड्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा सर्वांना वाटलं की तू संपलायस तेव्हाच तुम्ही इतिहास घडवलास.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल फायनलमध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले. सहा वर्षांनंतर या लीगला नवा विजेता मिळाला.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना कृणाल पांड्या कॅप्शनमध्ये म्हणतो, "माझ्या भावा, तुझ्या यशामागे किती मेहनत आहे हे फक्त तुलाच माहीत आहे. पहाटे, बऱ्याच तासांचं प्रशिक्षण, शिस्त आणि मानसिक स्ट्रेंथ आणि तुला ट्रॉफी उचलताना पाहणं हे तुझ्या परिश्रमाचं फळ आहे.
कृणाल पुढे म्हणतो, जेव्हा लोकांना वाटलं की तू संपला आहेस तेव्हाच तू इतिहास लिहित राहिलास. जेव्हा लाखो लोकं तुझ्या नावाचा जयघोष करत होते तेव्हा मी तिथे असायला हवं होतं.