द. आफ्रिकेने सामना जिंकला पण संपूर्ण टीमला बसला दंड

तीन टेस्ट सामन्याच्या मालिकेमधील दुसऱ्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 135 रनने पराभव केला. या सोबतच दक्षिण आफ्रिकाने टेस्ट सीरीज देखील 2-0 ने आपल्या नावे केली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 18, 2018, 08:34 AM IST
द. आफ्रिकेने सामना जिंकला पण संपूर्ण टीमला बसला दंड title=

सेंचुरियन : तीन टेस्ट सामन्याच्या मालिकेमधील दुसऱ्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 135 रनने पराभव केला. या सोबतच दक्षिण आफ्रिकाने टेस्ट सीरीज देखील 2-0 ने आपल्या नावे केली आहे.

फाफ डू प्लेसीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेची टीम भारताला सेंचुरियन टेस्टमध्ये पराभूत करण्यात यशस्वी जरी झाली असेली तरी आयसीसीने स्लो ओव्हर रेटसाठी त्यांना दंड ठोठावला आहे. मॅच रेफरी क्रिस ब्रॉडने हा दंड 2 ओव्हर उशिरा टाकल्याने हा दंड लावला आहे.

ब्रॉडने दक्षिण आफ्रिकेच्या टीमला आयसीसी 2.5.1 नियमानुसार दोषी ठरवलं आहे. सर्व खेळाडूंवर 20 टक्के तर कर्णधार डू प्लेसीवर 40 टक्के दंड लावण्यात आला आहे. डू प्लेसीने त्याचावरील आरोप स्वीकार केला आहे. यामुळे यावर सुनावणीची गरज नाही पडली.

कर्णधार डू प्लेसीसाठी आणखी एक अडचण वाढली आहे. कारण जर यावर्षी टेस्टमध्ये आफ्रिेकेची टीम पुन्हा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी ठरली तर डू प्लेसीवर एक सामन्याचा बॅन लागणार आहे.