IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने मॅच जिंकली पण विराट कोहलीने जिंकल मन

6 सामन्यांच्या वन डे सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेने चौथा सामना जिंकला. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 11, 2018, 01:40 PM IST
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने मॅच जिंकली पण विराट कोहलीने जिंकल मन title=

जोहानिसबर्ग : 6 सामन्यांच्या वन डे सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेने चौथा सामना जिंकला. 

जरी दक्षिण आफ्रिकेने जरी हा सामना जिंकला असला तरीही टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने मॅच दरम्यान उपस्थित असलेल्या फॅन्सचं मन जिंकलंय. टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाने रोहित शर्माची विकेट गमावली.

काय घडलं मैदानात

यानंतर मैदानावर कॅप्टन कोहली आणि शिखर धवन या जोडीने दमदार शतक केलं. याचदरम्यान 22 व्या ओव्हरमध्ये जेव्हा मोर्ने मोर्कल गोलंदाजी करण्यासाठी आला. तेव्हा कॅच पकडताना तो पडला. त्यावेळी तात्काळ कोहलीने मोर्कलजवळ जाऊन त्याला आधार दिला आणि त्याची विचारपुस केली. 

कोहली यासाठी आहे वेगळा

 

A post shared by Sumit (@7sumit7) on

मोर्कलने 22 व्या ओव्हरमध्ये बॉल फेकला तो बॉल कोहलीच्या बॅटवर योग्य पद्धतीने न गेल्यामुळे हवेत उडाला. याच शॉटला झेलताना मोर्केलने शानदार प्रदर्शन केलं. मात्र त्याचा हा प्रयत्न असफल ठरला. मोर्कल खाली पडताच त्याच्या कंबरेला दुखापत झाली. तेव्हा कोहलीच्या त्याच्याजवळ गेला आणि विचारपूस केली. मोर्केलजवळ जाताच त्याची चौकशी केल्यामुळे साऱ्यांच्या नजरा तिथे होत्या.