मुंबई : आयपीएल 2022 चे सामने लवकरच सुरू होणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकेचे काही खेळाडू पहिले सामने खेळू शकणार नाहीत. दक्षिण आफ्रिकेच्या काही खेळाडूंची बांग्लादेश दौऱ्यासाठी निवड झाली आहे. हे खेळाडू आयपीएलमध्ये देखील खेळणार होते. या खेळाडूंना देशासाठी क्रिकेट खेळायचं की आयपीएल असा पर्याय होता.
दक्षिण आफ्रिकेच्या काही खेळाडूंनी आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी सीरिज खेळणार नसून आयपीएल खेळण्यावर खेळाडू ठाम असल्याचं कळत आहे. एका अहवालानुसार दक्षिण आफ्रिकेच्या कोचने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना मनवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला आहे.
यंदाचं आयपीएल सर्वात मोठं असणार आहे. अशावेळी जर खेळाडू खेळणार नसतील तर BCCI त्यांना रिलीज करणार आहे. BCCI ने आपल्या नियमात कोणताही बदल केला नाही. कगिसो रबाडा पंजाब तर लुंगी एनगिडी दिल्ली संघातून खेळणार आहे. मार्को यानसन हैदराबाद संघाकडून खेळणार आहे.
तर दक्षिण आफ्रिकेचे स्टार खेळाडू कसोटी सामना खेळणार नसल्याने अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. जर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी कसोटी सीरिज खेळण्याचा निर्णय घेतला तर आयपीएलमधून बाहेर पडण्याशिवाय कोणताच पर्याय उरणार नाही.