World Cup 2023 पूर्वी टीम इंडिया मोठा धक्का; प्रमुख खेळाडूला झाली दुखापत

आगामी वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीमच्या अनुभवी फलंदाजाला प्रॅक्टिस सामन्यात दुखापत झाली आहे.

Updated: Feb 10, 2023, 09:07 PM IST
World Cup 2023 पूर्वी टीम इंडिया मोठा धक्का; प्रमुख खेळाडूला झाली दुखापत title=

ICC Womens T20 World Cup 2023: टी20 वर्ल्डकप (ICC Women's T20 World Cup) सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाची सर्वात अनुभवी फलंदाज आणि उपकर्णधार स्मृति मंधाना (Smriti Mandhana) पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यातून बाहेर होण्याची दाट शक्यता आहे. रविवारी टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला पाकिस्तानविरूद्ध खेळायचं आहे.

रविवारी पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यामध्ये स्मृति मंधाना खेळणार की नाही यावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मंधानाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध अभ्यास सामन्यात फिल्डींग दरम्यान तिला दुखापत झाली. 

आयसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "तिला प्रॅक्टिस सामन्यादरम्यान दुखापत झाली. मात्र ती वर्ल्डकपमधून बाहेर पडली आहे किंवा पाकिस्तानविरूद्ध खेळू शकते की नाही हे आताच सांगता येणार नाही."

कर्णधार हरमनप्रीतही दुखापतीने ग्रस्त

इतकंच नाही तर भारतीय महिला टीमची कर्णधार हरमनप्रीत कौर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यताही कमी असल्याचं म्हटलं जातंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्राय सिरीजच्या अंतिम सामन्यात हरमनप्रीतच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर ती अजूनही पूर्णपणे फीट होऊ शकलेली नाही.

आजपासून वर्ल्डकपला सुरुवात

आजपासून महिलांच्या या टी-20 विश्वचषकाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ श्रीलंकेशी (SL vs SA) भिडणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरू होईल. तर  भारतीय संघ रविवारी (12 फेब्रुवारी) किताबाच्या मोहिमेला सुरुवात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.  यादरम्यान भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) महिला संघांत हा सामना होणार आहे.

टीम इंडियाचे सामने

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या टीम इंडियाचा (team India) पहिला सामना 12 फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये पाकिस्तानविरुद्ध आहे. 15 फेब्रुवारीला याच मैदानावर वेस्ट इंडिजशी लढत होईल. तर 18 आणि 20 फेब्रुवारीला पोर्ट एलिझाबेथ येथे अनुक्रमे इंग्लंड आणि आयर्लंड यांच्याशी सामने होतील. टीम इंडियाचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजल्यापासून सुरू होतील.