Shubman Gill : Sara Tendulkar ने इन्स्टावर केलं गिलला फॉलो; ब्रेकअपनंतर दोघंही पुन्हा रिलेशनशिपमध्ये?

Shubman Gill Sara Tendulkar Relationship: शुभमनचं नाव पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत ( Sara Tendulkar ) जोडण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी सारा आणि शुभमनचं ( Shubman Gill ) ब्रेकअप झाल्याचा दावा करण्यात येत होता.

सुरभि जगदीश | Updated: Sep 17, 2023, 12:01 PM IST
Shubman Gill : Sara Tendulkar ने इन्स्टावर केलं गिलला फॉलो; ब्रेकअपनंतर दोघंही पुन्हा रिलेशनशिपमध्ये? title=

Shubman Gill Sara Tendulkar Relationship: टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिल ( Shubman Gill ) सध्या चांगलाच चर्चेत आले. सध्या एशिया कपचे सामने सुरु असून नुकतंच बांगलादेशविरूद्ध शुभमन गिलने उत्तम शतक ठोकलं. मात्र आता पुन्हा एकदा शुभमन गिल ( Shubman Gill ) त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. शुभमनचं नाव पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत ( Sara Tendulkar ) जोडण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी सारा आणि शुभमनचं ( Shubman Gill ) ब्रेकअप झाल्याचा दावा करण्यात येत होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता शुभमन ( Shubman Gill ) आणि सारा ( Sara Tendulkar ) यांनी पॅचअप केला असल्याचा दावा करण्यात येतोय. या कपलच्या नात्यात आता सर्व काही ठीक असल्याचं म्हटलं जातंय. नुकतंच सारा तेंडुलकरने ( Sara Tendulkar ) शुभमनची बहीण शाहनील गिललाही इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यास सुरुवात केलीये. त्यामुळे या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. ( झी 24 तास यासंबंधीच्या कोणत्याची चर्चांची किंवा दाव्यांची खातरजमा करत नाही. )

जुने स्क्रिनशॉट झाले व्हायरल

नुकताच शुभमन गिलने ( Shubman Gill ) त्याचा 25 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी शुभमन आणि सारा यांच्यातील काही जुने स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यापैकी एका स्क्रिनशॉटमध्ये, शुभमन गिलने ( Shubman Gill ) सोशल मीडियावर लाइव्ह घेतलं असता, त्यावर साराने ( Sara Tendulkar ) कमेंट केली होती की, HBDDDDDDD'.

शुभमन गिलने ठोकलं शतक

बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिलने ( Shubman Gill ) शतक ठोकलं आहे. या सामन्यात शुभमन बांगलादेशाच्या गोलंदाजांना एकटा नडला होता. यावेळी शुभमनने १२१ धावांची खेळी केली. शुभमन गिलने ( Shubman Gill ) यंदाच्या वर्षात एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. वनडे क्रिकेटमध्ये या वर्षात एक हजार धावांचा टप्पा ओलांडणारा गिल हा जगभरातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. आत्तापर्यंत रोहित शर्मा आणि विराट कोहलीला देखील अशी कामगिरी करता आली नाही. विराट कोहलीचा विक्रम देखील शुभमन गिलने ( Shubman Gill ) मोडीस काढला आहे.