Shubman Gill and Sara Tendulkar : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. वनडेत द्विशतक आणि टी20त शतक झळकावल्यानंतर त्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा रगंली आहे. मात्र मैदानाबाहेर देखील शुबमन अफेअरमुळे चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा वेलेंटाईन डे निमित्त त्यांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली आहे. खरं तर झालं असे आहे की, वेलंटाईन डे निमित्त शेअर केलेल्या एका फोटोने मोठा घोळ केला आहे. या फोटोमुळे शुबमन गिलच्या (Shubman Gill Affair) अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.
शुबमन गिलने (Shubman Gill) व्हॅलेंटाईन डे (valentine Day) निमित्त एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो रेस्टॉरंट किंवा कॅफेमध्ये बसून काहीतरी पेय घेताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने 'आज पुन्हा कोणता दिवस आहे?' असा प्रश्न चाहत्यांना केला आहे.साहजिकच आज वेलेंटाईन दिवस आहे. मात्र त्याच्या या फोटोचा सारा तेंडूलकरची संबंध काय येतोय, हे जाणून घेऊयात.
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच जुलै 2021 मध्ये सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. साराने त्यात लिहिले होते की,'अरे सिरी, माझे जेवण कुठे आहे?'. आता या फोटोचा आणि शुबमनच्या फोटोचा संबंध काय असा प्रश्न साहजिक तुम्हाला पडला असेल. तर त्याचं अस आहे की, या दोन्ही फोटोंचे बॅकग्राऊंड एकच आहे. तसेच हा फोटो एकाच दिवशी काढण्यात आल्याचे समजत आहे. सोशल मीडियावर चाहतेही फोटोवर अशाच प्रतिक्रिया देत आहेत. शुभमन गिलच्या (Shubman Gill) फोटोवर एका यूजरने लिहिले की, सारा तेंडुलकरची बॅकग्राऊंड, तर दुसर्या यूजरने लिहिले की, फोटोतील मागे डावीकडील मुलगी तोच माणूस आहे,असे म्हटले आहे.
या दोघांच्या पोस्टवरील हे दोन्ही फोटो पाहून पुन्हा एकदा दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र शुबमनने (Shubman Gill) वेलेंटाईचा टाईमिंग साधल्याचेही बोलले जात आहे.सध्या शुबमनच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. दरम्यान याआधी 2020 मध्ये गिल आणि सारा तेंडुलकरने त्याच कॅप्शनसह एकाच वेळी फोटो पोस्ट केले. तेव्हापासून सोशल मीडियावर दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती.
शुबमन गिल (Shubman Gill) सध्या टीम इंडियाच्या टेस्ट स्कॉडमध्ये आहे. 17 फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीत खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी तो मैदानात घाम गाळतोय.मात्र सोशल मीडियावर त्याच्या अफेअरची चर्चा रंगली आहे.