Shubman Gill च्या सिक्सनंतर मैदानात ड्रामा; बराच वेळ खेळ थांबला, अखेर...!

झालं असं की, शुभमन गिलने लगावलेल्या सिक्समुळे काहीवेळ खेळ थांबवावा लागला. हा संपूर्ण ड्रामा भारतीय डावाच्या 10 व्या ओव्हरमध्ये झाला.

Updated: Mar 10, 2023, 09:36 PM IST
Shubman Gill च्या सिक्सनंतर मैदानात ड्रामा; बराच वेळ खेळ थांबला, अखेर...! title=

Shubman Gill SIX : अहमदाबच्या स्टेडियममध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा (Border Gavaskar Trophy) चौथा सामना खेळवण्यात येतोय. या सिरीजमध्ये टीम इंडियाने पूर्वीच 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून टीम इंडिया सिरीज जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 480 रन्सवर आटोपला. तर दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारत 36 नाबाद अशा स्थितीत आहे. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) फलंदाजीसाठी उतरले. यावेळी शुभमन गिलच्या सिक्सची सगळीकडे चर्चा होताना दिसतेय. 

गिलच्या सिक्सनंतर मैदानात ड्रामा

झालं असं की, शुभमन गिलने लगावलेल्या सिक्समुळे काहीवेळ खेळ थांबवावा लागला. हा संपूर्ण ड्रामा भारतीय डावाच्या 10 व्या ओव्हरमध्ये झाला. नॅथन लियॉनच्या दुसऱ्या बॉलवर मिड-ऑनच्या वरून शुभमनने शॉट खेळला. शुभमनचा हा शॉट इतका जबरदस्त होता की, बॉल साईट स्क्रिनच्या जवळ असलेल्या सीटच्या कोपऱ्यात अडकला गेला. यानंतर बॉलची शोधाशोध सुरु झाली. 

त्याठिकाणी बसलेल्या लोकांनी बॉल शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र बॉल मिळाला नाही. बॉल न मिळाल्याने फोर्थ अंपायर बॉलचा सेट घेऊन मैदानात येतात आणि नव्या बॉलने खेळ सुरु करण्याचा निर्णय घेतात. 

तितक्यातच त्या ठिकाणी बसलेल्या एका प्रेक्षकाला बॉल सापडतो आणि हा बॉल तो प्रेक्षक मैदानात फेकतो. यानंतर या पुढचा खेळ अंपायर जुन्या बॉलनेच खेळवण्याचा निर्णय घेतात. दरम्यान हा संपूर्ण ड्रामा सुरु असेपर्यंत खेळ मात्र थांबलेला असतो.  

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडिया नाबाह 36 रन्सवर आहे. कर्णधार रोहित शर्मा 17 आणि शुभमन गिल 18 रन्सवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या टीमने पहिल्या इनिंगमध्ये 480 रन्स केले आहेत. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 180 आणि कॅमेरून ग्रीनने 114 रन्सची उत्तम खेळी केली. टीम इंडियाकडून स्पिनर रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक म्हणझेच 6 विकेट पटकावल्या. तर मोहम्मद शमीला 2 विकेट्स घेण्यात यश आलं आहे.