Shubhman Gill Double Century : भारत आणि न्यूझीलंड (India Vs New Zealand) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium) सुरू आहे. न्यूझीलंडचा संघ पाच वर्षांनंतर भारतात वनडे मालिका खेळत असल्याने टीम इंडियाकडे नामी संधी चालून आली आहे. अशातच आता पहिल्या सामन्यात टीम इंडियाने डोंगराऐवढी धावसंख्या उभारून पाहुण्या न्यूझीलंडला 350 धावांचा टार्गेट दिलंय. या सामन्यात सलामीवीर शुभमन गिलने वादळी खेळी करत द्विशतक ठोकलंय. (Shubman Gill Double Century in India Vs New Zealand Today ODI Match marathi news)
शुभमनने पहिल्या ओव्हरपासून शेवटच्या ओव्हरपर्यंत फलंदाजी केली. शुभमन गिलने 149 बॉलमध्ये 208 धावा केल्या. त्यामध्ये 19 फोर आणि 9 गगनचुंबी षटकाराचा समावेश देखील आहे. 139 च्या स्टाईक रेटने शुभमनने खणखणीत शतक ठोकलं. एकीकडे एकामागून एक विकेट जात असताना शुभमनने एक बाजू लावून धरली आणि भारताला 349 पर्यंत पोहोचवलं.
A SIX to bring up his Double Hundred
Watch that moment here, ICYMI #INDvNZ #TeamIndia @ShubmanGill pic.twitter.com/8qCReIQ3lc
— BCCI (@BCCI) January 18, 2023
पहिल्या डावात गिलच्या डबल् सेंच्यूरीच्या बळावर टीम इंडियाने 8 विकेट गमावून 349 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे आता न्यूझीलंडसमोर 350 धावांचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंडकडून हेन्री शिपले आणि डेरिल मिचेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. त्याशिवाय आणखी कोणत्याही गोलंदाजाला मोठी कामगिरी करता आली नाही. तर दुसरीकडे भारताचे फलंदाज देखील ढेपाळल्याचं दिसून आलंय.
आणखी वाचा - IND vs NZ 1st ODI : शुभमन गिलची बॅट तळपली, दिग्गज खेळाडूंना टाकले मागे
दरम्यान, शुभमन गिलने (Shubman Gill)हे शतक ठोकताच आपल्या नावे एक खास विक्रम केला आहे. गिल हा भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. ही खेळी करून गिलने विराट कोहलीचा (Virat kohli) रेकॉर्ड मोडलाय. कारण गिलने 19 व्या सामन्यात हा पराक्रम केला आहे. तर कोहलीने कारकिर्दीतील 24 व्या वनडेत 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.