दोघात तिसरा! शुभमन गिल नव्हे, 'हा' आहे सारा तेंडुलकरचा रुमर्ड बॉयफ्रेंड?

Sara Tendulkar Rumoured Boyfried: अलीकडेच एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे ज्यामध्ये सारा तेंडुलकर एका व्यक्तीसोबत स्पॉट झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

Updated: Nov 24, 2023, 03:34 PM IST
दोघात तिसरा! शुभमन गिल नव्हे, 'हा' आहे सारा तेंडुलकरचा रुमर्ड बॉयफ्रेंड?  title=

Sara Tendulkar Rumoured Boyfried: वर्ल्ड कपदरम्यान सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या समोर आल्या. सोशल मीडियात यासंदर्भात अनेक मिम्सही व्हायरल झाले. या बातम्या दोघांनी मान्यही केल्या नाहीत किंवा फेटाळल्याही नाहीत. सारा आणि शुभमन दोघांनीही या चर्चांवर शांत राहणे पसंत केले आहे. देशभरात या चर्चा सुरु असताना आता साराचे नाव एका तरुणाशी जोडले जातंय, पण हा शुभमन गिल नाहीय. मग कोण आहे हा तरुण? का होतेय अशी चर्चा? जाणून घेऊया.

शुभमन गिलला सपोर्ट करण्यासाठी सारा तेंडुलकर मॅचला येत असे लोकांना वाटायचे. दोघांच्या फोटोखाली यूजर्स तशा कमेंट्सही करायचे पण आता एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे. एकीकडे शुभमन गिल आणि साराच्या कथित प्रेमाची कहाणी पुढे जात नसताना आता एका नव्या व्यक्तीचे नाव समोर येऊ लागले आहे. सारा तेंडुलकर शुभमनला नाही तर दुसऱ्या कुणाला डेट करत असल्याचं बोललं जात आहे.

अलीकडेच एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे ज्यामध्ये सारा तेंडुलकर एका व्यक्तीसोबत स्पॉट झाल्याचं सांगण्यात येत आहे. हा तरुण  सारा तेंडुलकरसोबत सामना पाहताना दिसला होता. एवढेच नव्हे तर सारा तेंडुलकरसोबतही तो अनेकदा स्पॉट झाला आहे. खुशप्रीत सिंग औलख असे या तरुणाचे नाव आहे. सारा तेंडुलकरही त्याला इन्स्टाग्रामवर फॉलो करते. खुशप्रीत सिंग हा शुभमन गिलचा जुना मित्र आहे. साराची खुशप्रीतची भेट शुभमनच्या माध्यमातून झाल्याचे समजते. इतकंच नव्हे तर शुभमन जिओ प्लाझा लॉन्च इव्हेंटमधून निघून गेल्यावर खुशप्रीत सारासोबत उभी दिसली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @shubmangill.___

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये खुशप्रीत सिंग आणि सारा तेंडुलकरसोबत वेळ घालवतानाच्या अनेक क्लिप दाखवण्यात आल्या आहेत. कदाचित सारा शुभमनला नाही तर खुशप्रीत सिंगला डेट करत असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि काही वेळातच तो व्हायरल झाला. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की बी-टाउन सेलेब ओरीलाही तो आवडला. ओरी हा सारा तेंडुलकरचा जवळचा मित्र आहे. फोटो-व्हिडीओवरवर ओरीने लाइक्स केले आहे. हे पाहून ऑरी शुभमनला याबद्दल नक्कीच सांगेल, असे गिलचे चाहते म्हणत आहेत. ऑरीसोबतच खुद्द शुभमन गिललाही हा रील आवडला. पण लोकांचे लक्ष त्याच्या लाईककडे गेले आणि त्याने ते काढून घेतले.

चाहत्यांना आला संशय 

व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्सचा पाऊस सुरू झाला. या व्हिडिओला लाईक करून दोघेही अफवांना दुजोरा देत ​​असल्याचे लोक म्हणू लागले. नक्की काय सुरु आहे, हे शुभमन आणि खुशप्रीत हेच सांगू शकतात. जोपर्यंत सारा तेंडुलकर दुजोरा देत नाही तोपर्यंत तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा या अफवाच ठरणार आहेत.