नाईट क्लबला जाणं पडलं महागात, क्रिकेटरवर वर्षभराची बंदी

त्याच्या वार्षिक फिच्या २० टक्के दंड आकारण्यात आलायं. 

Updated: Jul 22, 2018, 07:13 PM IST
नाईट क्लबला जाणं पडलं महागात, क्रिकेटरवर वर्षभराची बंदी  title=

मुंबई : श्रीलंकेचा लेग स्पिनर जेफ्री वेंडरसेला एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलंय.  त्याच्या वार्षिक फिच्या २० टक्के दंड आकारण्यात आलायं. वेस्ट इंडिज दौऱ्यावर बारबडोसमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचआधीच त्याला घरी पाठविण्यात आलंय. सेंट लूसियामध्ये 'नाइट आऊट' केल्यानंतर श्रीलंका क्रिकेटने वेंडरसेवर कडक कारवाई केलीयं.

रस्ता विसरल्याचे कारण 

मीडिया रिपोर्टनुसार, दुसरी टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर वेंडरसे आणि इतर तीन खेळाडू सेंट लूसियामध्ये नाइट क्लबला गेले होते. दुसऱ्या दिवशी २८ वर्षाचा हा क्रिकेटर आपल्या रुममधून बाहेर न आल्याने टीम मॅनेजमेंटने पोलिसांत तक्रार केली. आपल्याला बाकीचे खेळाडू नाइट क्लबमध्ये सोडून आल्याने आपण रस्ता विसरल्याचे काही तासांनी हॉटेलमध्ये पोहोचलेल्या वेंडरसेने टीम मॅनेजमेंटला सांगितले.  वेंडरसेचा कॅरेबियन दौरा २३ जून ला संपणार होता पण कमेटीने टूरवरील टीम मॅनेजर, असंका गुरूसिंहा यांचा रिपोर्ट वाचल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली. आगामी दक्षिण आफ्रिता दौऱ्यातूनही त्याला डच्चू देण्यात आलायं.

वादग्रस्त वेंडरसे 

वेंडरसेने खेद व्यक्त केल्यानंतर त्याच्यावर निलंबन आणि दंडात्मक कारवाई करण्यात आली. करारातील कोणताही नियम तोडल्यास कडक कारवाई होईल अशी सक्त ताकीद देण्यात आली होती. वादात अडकण्याचं वेंडरसेच हे काही पहिलंच प्रकरण नाही. गेल्यावर्षी भारत दौऱ्याआधी स्थानिक मॅचमध्ये न खेळल्याने त्याला वॉर्निंगही देण्यात आली होती.