अरे बापरे... Shreyas Iyer ची नवी कोरी कोट्यवधींची कार चोरीला?

यावेळी श्रेयस अय्यर पिंक शर्ट आणि फंकी स्टाईलमध्ये रस्त्यावर फिरत होता.

Updated: Jun 4, 2022, 07:51 AM IST
अरे बापरे... Shreyas Iyer ची नवी कोरी कोट्यवधींची कार चोरीला? title=

मुंबई : टीम इंडियानंतर आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर श्रेयस अय्यरच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. केकेआरच्या कर्णधाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दरम्यान, श्रेयस अय्यरशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो सेलिब्रिटी स्टेटसच्या पलीकडे कॉमन मॅनप्रमाणे रस्त्यावर वावरताना दिसतोय.

यावेळी श्रेयस अय्यर पिंक शर्ट आणि फंकी स्टाईलमध्ये रस्त्यावर फिरताना दिसला. यादरम्यान श्रेयस अय्यरला 'तू गाडी शोधत राहतोयस का?' असा प्रश्न विचारला गेला. यावरून अनेकांच्या मनात श्रेयसची नवी कोरी कार चोरीला गेल्याचा प्रश्नही उपस्थित राहिला. मात्र तसं काही नसून चाहत्यांनी केवळ त्याला गाडी शोधत असण्याबाबत प्रश्न केला आहे.

तर काही जणांनी अय्यरला त्याच्या लूक आणि स्टाइलची प्रशंसा केली आहे. दरम्यान श्रेयस रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीयो व्हायरस झाला आहे. श्रेयस अय्यर IPL 2022 मध्ये KKR टीमचा कर्णधार होता.

नुकतंच श्रेयस अय्यरने एक आलिशान Mercedes-AMG G 63 4Matic SUV खरेदी केली आहे. या कारची किंमत 2.45 कोटी रूपये इतकी आहे. 

श्रेयस अय्यरची त्याच्या सर्व-नवीन SUV ची डिलिव्हरी घेतानाची फोटो व्हायरल झाले आहेत. Mercedes-AMG G 63 4MATIC हे प्रसिद्ध G-Wagon सिरीजमधील टॉप मॉडेल आहे. या कारच्या स्पीडबद्दल बोलायचं झालं तर ही SUV 0 ते 100 किमी/तासचा वेग फक्त 4.5 सेकंदात पकडते.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सची आयपीएलमध्ये कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. पॉईंट्स टेबलमध्ये केकेआर सातव्या स्थानावर होती. केकेआरच्या टीमने 14 पैकी 6 सामने जिंकले, तर उर्वरित 8 सामन्यात टीमला दारुण पराभवाला सामोरं जावं लागले.