Ball Stuck Mustafizur Rahman Head : बांग्लादेशचा स्टार फास्टर गोलंदाज मुस्तफिझूर रहमान (Mustafizur Rahman) याला बांगलादेश प्रीमियर लीग (BPL 2024) सामन्यापूर्वी प्रॅक्टिस सेशन दरम्यान डोक्याला मार लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी सराव करत असताना ही घटना घडली. त्याचा व्हिडीओ (Viral Video) देखील समोर आला आहे. जखमी मुस्ताफिझूरला चट्टोग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर ही घटना घडली. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) यासंबंधी एक निवदेन देखील जारी केलंय.
Hope for your speedy recovery #MustafizurRahman #BPL2024 pic.twitter.com/ymnQXxo10m
— Masum (@masum_twt) February 18, 2024
नेमकं काय झालं?
झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर बांगलादेश प्रीमियर लीगसाठी बांगलादेशचे खेळाडू सराव करत होते. नेहमीप्रमाणे प्रत्येक खेळाडू सराव करत होता. त्यावेळी कोमिल्ला व्हिक्टोरियन्सच्या नेटमध्ये एकाच वेळी फलंदाजीचा सराव देखील सुरू होता. बांगलादेशचा लिटन दास फलंदाजी करत असताना त्याने एक जोराचा फटका मारला. तो बॉल नेटच्या बाहेर गेला अन् गोलंदाजीची तयारी करणाऱ्या मुस्ताफिझूरच्या डोक्याला जाऊन बॉल लागला.
मुस्ताफिझूरला बॉल लागल्यावर त्याला काहीही कळालं नाही. तो खाली गुडघ्यावर बसला. तेवढ्या आजूबाजूला उभे असलेल्या कोच आणि खेळाडूंनी मुस्ताफिझूरकडे धाव घेतली. त्यावेळी त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचं दिसून आलं. खेळाडूंनी स्टेचर मागवले अन् त्याला तातडीने अँम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेलं.
दरम्यान, सीटी स्कॅननंतर आम्हाला समाधान मिळालंय की त्याला फक्त बाह्य जखम होती. इंट्राक्रॅनियल रक्तस्त्राव झाला नाही. आता डॉक्टरांनी त्याला उघड्या जखमेवर टाके दिले आहेत, अशी माहिती टीम फिजिओ झाहिदुल इस्लाम यांनी दिली आहे.
Mustafizur Rahman is fine and healthy. Scan report is good. No internal injuries. Cut in the head. Got stitches.#MustafizurRahman pic.twitter.com/Taa7XfGayk
— Abdullah Neaz (@Neaz__Abdullah) February 18, 2024
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचं प्रेस रिलीज
सरावादरम्यान एक चेंडू थेट मुस्तफिझूर रहमानच्या डाव्या पॅरिएटल भागात (डोक्याला) लागला. त्याच्या पॅरिएटल भागात एक जखम होती आणि आम्ही रक्तस्त्राव थांबवण्यासाठी कॉम्प्रेशन पट्टीने प्रथमोपचार केले आणि त्याला ताबडतोब इम्पीरियल हॉस्पिटलमध्ये हलवलं, असं निवेदन बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (BCB) दिलं आहे.