Shoaib Malik Sania Mirza divorce: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि तिचा पती क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांचा घटस्फोट झाल्याचं बोललं जात आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांची एक क्रॉस बॉर्डर लव्ह स्टोरी (Love Story) आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोटाबाबतच्या (Shoaib Malik Sania Mirza divorce) चर्चांणा उधाण आलं आहे. हीच चर्चा सुरू असताना आता पाकिस्तानी अभिनेत्री आयशा ओमरची (Ayesha Omar) जुनी कमेंट व्हायरल होत आहे.
सानियाला घटस्फोट दिल्यानंतर शोएब आयशाशी (Shoaib Malik Ayesha Omar) लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता टेनिसचं कोर्ट आणि क्रिकेटचं मैदान वेगळं होणार का?, असा सवाल उपस्थित केला जातोय. पाकिस्तानी अभिनेत्रीने (Pakistani Actress Ayesha Omar) या सर्व चर्चा सुरू असताना कोणतंही वक्तव्य करण्याचं टाळलंय. त्यानंतर आता तिची जुनी कमेंट व्हायरल होत आहे. शोएब सानिया मिर्झासोबत आनंदी जीवन जगत आहे आणि तिला त्या दोघांबद्दल खूप आदर आहे, असं आयशा म्हणाली आहे.
शोएब आणि तुझ्या लग्नाचं काही ठरलंय का, असा सवाल आयशाला विचारण्यात आला. त्यावर.... नाही, अजिबात नाही. तो विवाहित आहे आणि त्याच्या पत्नीसोबत खूप आनंदी आहे. मी शोएब आणि सानिया दोघांचा खूप आदर करते. शोएब आणि मी चांगले मित्र (We are just Friends) आहोत आणि एकमेकांची काळजी घेतो. खूप आदर करतो. या जगात लोकांमध्ये असे संबंध अजून तरी असतात, असं आयेशा म्हणाली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी शोएब आणि आयशाने एका मासिकासाठी (Shoaib Malik Ayesha Omar PhotoShoot) एकत्र फोटोशूट केलं होतं. त्यानंतर त्यांचे फोटो तुफान व्हायरल झाले होते. अशातच आता आयशाची जुनी कमेंट नेटकऱ्यांनी शोधून काढली. त्यामुळे पुन्हा एकदा सोनिया आणि शोएब चर्चेचा विषय ठरत आहेत.