मुंबई : भारताचा सलामीवीर क्रिकेटर शिखर धवनने रिटायरमेंटनंतर तो काय करणार आहे याचा खुलासा केलाय. रिटायर झाल्यानंतर तो कुटुंबाच्या व्यवसायात लक्ष देणार आहे. धवनने एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना याचा खुलासा केला. धवन म्हणाल, क्रिकेटरमधून रिटायर झाल्यानंतर मी बिझनेस करेन. यावेळी या कार्यक्रमात हैदराबादचे गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरनही होते.
मुरलीधरन म्हणाले, त्यांच्या काळात गोलंदाजी करणे सोपे असायचे कारण त्यावेळ खेळ हा फलंदाजांच्या पक्षात नव्हता. याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, आता खेळ खूप पुढे गेलाय. ज्या प्रमाणे फलंदाजी फलंदाजी करतोय त्याप्रमाणे गोलंदाजी करणे कठीण जालेय.
मी जास्त टी-२० खेळलो नाही. तसेच सध्या कसोटीमध्ये ज्याप्रमाणे षटकार हवेत मारले जातात तसेच आमच्यावेळेस नव्हते. आमच्यावेळेस गोलंदाजी करणे सोपे होते. यावेळी १९९६मध्ये वर्ल्डकप जिंकणे हा करियरमधील सर्वात मोठा क्षण असल्याचे मुरलीधरनने यावेळी सांगितले.
धवन हा टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर आहे.त्याने आतापर्यंत १०२ वनडे सामने खेळलेत यात त्याने ४३६१ धावा केल्यात. यात १३ शतके आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे. धवनचा वनडेत सर्वाधिक स्कोर आहे १३७. धवन २९ कसोटी सामने खेळलाय. त्यात त्याने ६ शतके आणि ५ अर्धशतकांसह २०४६ धावा केल्यात. यातील धवनची १९० ही सर्वोच्च खेळी आहे.