मुंबई : टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंकडे त्यांची खेळण्याची खास शैलीच नाही तर कलाही आहे. त्याच सोबत प्रत्येक खेळाडूची आनंद साजरा करण्याची पद्धतही हटके आहे. बरेचदा इतर खेळाडू त्याची खिल्ली उडवतात किंवा ते कॉपी करून आत्मसात करण्याचा प्रयत्नही काही वेळा केला जातो. पण एका क्रिकेटपटूला असं करणं चांगलंच भोवलं आहे.
शिखर धवनची सेलिब्रेशन करताना किंवा आनंद झाल्यानंतर तो साजरा करण्याची स्टाईल आहे. मांड्या थोपटून तो आपलं सेलिब्रेशन करतो. जसं कबड्डीमध्ये ही गोष्ट करणं म्हणजे फार सामान्य आहे. मात्र शिखर धवन क्रिकेटच्या मैदानातही आपली मांडी थोपडून काहीवेळा यश साजरं करताना दिसला आहे.
शिखर धवनची हीच स्टाईल एका क्रिकेटपटूनं कॉपी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तेच महागात पडलं. क्रिकेटर पाकिस्तानी ऑफ स्पिनर साजिद खानने शिखर धवनची कॉपी केली आहे. साजिदने 4 क्रिकेट सामन्यात 18 विकेट्स घेतल्याचा धवनची स्टाईल कॉपी केली. त्या स्टाईलनं सेलिब्रेशनही केलं.
याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर साजिदवर 2 वर्षांसाठी बंदी लावण्यात आली आहे. क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं सेलिब्रेशन करणं मला महागात पडल्याची भावना साजिदने व्यक्त केली आहे.