स्पायडरमॅनचा भांगडा ; शिखर धवनने शेअर केला मजेशीर व्हिडिओ...

टीम इंडियाचा गब्बर म्हणजेच शिखर धवन इंग्लंड दौऱ्यानंतर आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. 

Updated: Jun 12, 2018, 10:41 AM IST
स्पायडरमॅनचा भांगडा ; शिखर धवनने शेअर केला मजेशीर व्हिडिओ... title=

मुंबई : टीम इंडियाचा गब्बर म्हणजेच शिखर धवन इंग्लंड दौऱ्यानंतर आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. त्याचबरोबर शिखर सोशल मीडियावरही भलताच अॅक्टीव्ह आहे. तो नेहमीच आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओज, फोटोज शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने स्वतःचा बासरी वाजवतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. आता पुन्हा एकदा त्याने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत स्पायडरमॅन डान्स करत आहे.

शिखर धवनचा मुलगा जोरावर आणि मुलगी रियाचा हा व्हिडिओ आहे. यात मुलाने स्पायडरमॅनचे कपडे घातले आहेत आणि दोघेही मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओत जोरावर रियाच्या मागे धावताना दिसत आहे. मध्येमध्ये हा स्पायडरमॅन डान्स करत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत शिखर धवनने लिहीले की, आमच्या घरात दोन सुपरहिरो आहेत... हाहाहा... स्पायडर भांगडा...

 

Watch out! We have two superheroes in the house! Lol Spider Bhangra 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

शिखर धवनने २९ टेस्ट मॅचमध्ये २०४६ धावा केल्या आहेत. तर १०२ वनडे मॅचेसमध्ये ४३५१ धावा केल्या आहेत. शिखर आतापर्यंत ३६ टी-२० मॅचेस खेळला असून त्यात त्यांनी ८८४ धावा केल्या आहेत. तर आयपीएलच्या १४३ मॅचेसमध्ये ४०५७ धावा केल्या आहेत.