IPL 2023 : खराब फील्डिंगवर संतापला Shikhar Dhawan; खेळाडूला केली शिवीगाळ

सोशल मीडियावर शिखर धवनचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये शिखर संतापलेला दिसतोय.

Updated: Apr 1, 2023, 09:16 PM IST
IPL 2023 : खराब फील्डिंगवर संतापला Shikhar Dhawan; खेळाडूला केली शिवीगाळ title=

Shikhar Dhawan : आयपीएलच्या 16 व्या सिझनला (IPL 2023) सुरुवात झाली आहे. आज दुसरा सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळवला गेला. पंजाबची टीम यंदाच्या सिझनमध्ये पहिल्यांदा कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली मैदानात उतरली होती. इतकंच नाही तर पहिलाच सामना पंजाबने विजय देखील मिळवला. मात्र या सामन्यात शिखर धवनच्या एका कृत्यावर चाहते मात्र नाराज झालेत. 

सोशल मीडियावर शिखर धवनचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये शिखर संतापलेला दिसतोय. इतकंच नव्हे तर आपल्याच टीमच्या खेळाडूला अपशब्द वापरताना दिसला आहे. 

भर मैदानात शिखर धवनने केली शिवीगाळ?

केकेआरची फलंदाजी सुरु असताना ही घटना घडली. यावेळी पंजाबने भानुका राजपक्षेच्या जागी ऋषी धवनला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. यावेळी मात्र धवनच्या पहिल्याच ओव्हरमध्ये एकूण 15 रन्स झाले. यावेळी रसेल आणि वेंकटेश अय्यर गोलंदाजांची धुलाई करत होते.

त्यानंतर 11 व्या ओव्हरमध्ये राहुल चहर गोलंदाजी करताना ही घटना घडली. यावेळी फिल्डरकडून झालेल्या चुकीने शिखर धवन भर मैदानात संतापला आणि त्याने खेळाडूला अपशब्द वापरले. दरम्यान त्याने कोणत्या खेळाडूवर राग काढला हे समोर आलेलं नाही. मात्र त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पंजाबचा केकेआरवर विजय

पंजाब आणि केकेआर यांच्या सामन्यात अखेर पंजाबने बाजी मारली. मुख्य म्हणजे या सामन्यात पावसाने खेळ केला, मात्र तरीही केकेआरचा पराभव झाला. केकेआर डीआरएसच्या नियमांनुसार 7 रन्सने मागे होती. त्यामुळे सिझनमधील पहिलाच सामना कोलकात्याला गमवावा लागला.

आजच्या या सामन्यात कर्णधार नितीश राणाने टॉस जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजी दिली. पंजाबसाठी हा निर्णय फार योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 192 रन्सचं लक्ष्य ठेवलं. यावेळी शिखर धवनने 137.93 च्या स्ट्राईक रेटने 29 बॉल्समध्ये 6 चौकारांच्या मदतीने 40 रन्सची उत्तम खेळी केली. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x