SA vs IND: शार्दुलने कटकट संपवली! 185 धावा कुटणाऱ्या डीन एल्गारचा खेळ खल्लास; पाहा Video

IND vs SA 1st Test: गेल्या दोन दिवसांपासून मैदानात पाय रोऊन उभ्या असलेल्या डीन एल्गारला (Dean Elgar) शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) तंबूत पाठवलं. त्यामुळे कॅप्टन रोहितने सुटकेचा श्वास घेतलाय.

सौरभ तळेकर | Updated: Dec 28, 2023, 05:34 PM IST
SA vs IND: शार्दुलने कटकट संपवली! 185 धावा कुटणाऱ्या डीन एल्गारचा खेळ खल्लास; पाहा Video title=
SA vs IND 1st Test, Dean Elgar departs by Shardul Thakur

SA vs IND 1st Test : भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात सेंच्यूरियनमध्ये (Centurion Test) पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 245 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आफ्रिका संघाने तगडी झुंज देत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकललं. साऊथ अफ्रिकेने तिसऱ्या दिवशी वर्चस्व गाजवलं असून डीन एल्गर (Dean Elgar) याच्या धमाकेदार खेळीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. डीन एल्गर आणि टोनी डी जोर्जी यांनी टिकून राहत आफ्रिकन गोलंदाजांचा घाम काढला. त्यानंतर डेव्हिड बेडिंगहॅम याने अर्धशतकीय खेळी करत अफ्रिकेला मजबूत स्थिती पोहोचवलं आहे. अशातच आता शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने कॅप्टन रोहित शर्माची टेन्शन खल्लास केलंय.

गेल्या दोन दिवसांपासून मैदानात पाय रोऊन उभ्या असलेल्या डीन एल्गारला शार्दुल ठाकूरने तंबूत पाठवलं. तब्बल 287 बॉलचा सामना करत एल्गारने धावांची खेळी केली. त्यामुळे 200 धावा झाल्या साऊथ अफ्रिका मजबूत आघाडी तयार करेल, अशी शक्यता होती. मात्र, लॉर्ड शार्दुल मदतीला धावून आला अन् त्याने खतरनाक अशा डीन एल्गार याला तंबूत धाडलं. 

पाहा Video

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन) : डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नंद्रे बर्गर.

भारत (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.