Shane Warne Last Photo: निधनापूर्वीचा शेन वॉर्नचा शेवटचा फोटो आला समोर!

मृत्यूनंतर आता शेन वॉर्नचा शेवटचा फोटो समोर आला आहे.

Updated: Mar 9, 2022, 08:07 AM IST
Shane Warne Last Photo: निधनापूर्वीचा शेन वॉर्नचा शेवटचा फोटो आला समोर! title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्पिनर शेन वॉर्नचं 4 मार्च रोजी निधन झालं. थायलंडला सुट्टीचा आनंद घ्यायला गेला असताना हार्ट अटॅकने त्याचं निधन झालं आहे. वॉर्नच्या निधनाने सर्व क्रिडा चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये देखील वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला असल्याचं समोर आलं आहे. तर आता शेन वॉर्नचा शेवटचा फोटो समोर आला आहे.

शेन वॉर्नचा मित्र टॉम हॉल याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा हा फोटो शेअर केला आहे. त्याने वॉर्न संदर्भात एक ब्लॉगंही लिहीला आहे. शेनचा हा फोटो थायलंडच्या त्या व्हिलामध्ये क्लिक करण्यात आलाय जिथे वॉर्नचं निधन झालं.

टॉमच्या म्हणण्यानुसार, हा शेन वॉर्नचा शेवटचा फोटो आहे. या फोटोमध्ये शेन वॉर्न हसतोय आणि त्याच्या डोक्यावर एक टोपी आहे. शिवाय त्याने व्हिलाचे अजूनही काही फोटो पोस्ट केले आहेत. 

टॉम म्हणतो की, थायलंडमध्ये जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा शेनचा पहिला प्रश्न होता की, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कसा पाहू शकतो. 

शेन वॉर्न थायलंडमधील कोह सामुई इथल्या समझजुना व्हिलामध्ये त्याच्या काही खास मित्रांसोबत सुट्ट्या एन्जॉय करत होता. दरम्यान, 4 मार्च रोजी तो त्याच्या खोलीत असताना शेन वॉर्न बेशुद्ध परिस्थितीत आढळला होता. शेन वॉर्नला हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला