मुंबई : ऑस्ट्रेलियाचा महान स्पिनर शेन वॉर्नचं हार्ट अटॅकमुळे शुक्रवारी थायलंडमध्ये निधन झालं. वयाच्या 52 व्या वर्षी शेन वॉर्नने अखेरचा श्वास घेतला. दरम्यान क्रिकेटच्या मैदानाव्यतिरिक्त पर्सनल लाईफसोबतही खूप चर्चेत राहिला आहे. यामध्ये वादाचं प्रमाणंही बरंच आहे. पाहा शेन वॉर्नचे वादग्रस्त असलेले काही किस्से-
1994 मध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर शेन वॉर्न आणि मार्क वॉ भारतीय सट्टेबाजांसोबत पिच आणि वातावरणासंबंधीच्या परिस्थितीचा खुलासा केल्याचा आरोप करण्यात आला होता.
2003 वर्ल्डकप वेळी पाकिस्तानविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वी शेन वॉर्नची ड्रग टेस्ट करण्यात आली होती. ज्यामध्ये त्याची टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. वॉर्नच्या युरिनमध्ये मोडुरेटिक औषध मिळालं होतं. या औषधामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल होतं.
2000 साली ब्रिटिश नर्स डोना राइट हिने वॉर्नवर अश्लिल वर्तणूक केल्याचा आरोप केला होता. यामध्ये त्याने नर्सशी, गैरवर्तणूक आणि अश्लील संवाद केल्याचं म्हटलं होतं.
वॉर्नने निकोटीन रिप्लेसमेंट थेरेपी प्रोडक्ट निकोरेटे सोबत करार केला होता. यामध्ये तो सिगारेट ओढू शकत नव्हता. मात्र 2008 मध्ये ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दौऱ्यावर असताना त्याने धुम्रपान करताना फोटो काढला होता. यानंतर तो वादात सापडला होता.
2013मध्ये शेन वॉर्नचं नाव हॉलिवूड अभिनेत्री लिज हर्लेसोबत जोडण्यात आलं होतं. 2011 मध्ये दोघांनी साखरपुडाही उरकला होता. मात्र त्यानंतर दोघांची पुढे काही जमलं नाही. एका मॅगझिनशी बोलताना दोघांनी त्यांचं नातं तुटलं असल्याचं सांगितलंय.
2017 सप्टेंबरमध्ये पॉर्न स्टार वलेरी फॉक्ससोबत लंडनमध्ये बाचाबाची झाल्याचा आरोप शेन वॉर्नवर लावण्यात आला होता. त्यावेळी वलेरीने तिच्या दुखापतग्रस्त डोळ्याचा फोटोही शेअर केला होता. यावेळी तिने कॅप्शनमध्ये म्हटलं होतं की, तुम्ही खूप प्रसिद्ध व्यक्ती असाल मात्र याचा अर्थ असा नाही की, तुम्ही एखाद्या महिलेवर हात उचलाल.