मुंबई : क्रिकेट जगताला धक्का देत आणि क्रीडा रसिकांच्या मनाला चटका लावत महान फिरकीपटू शेन वॉर्न यांनी अखेरचा श्वास घेतला. थायलंडमधील एका प्रश्स्त व्हिलामध्ये वॉर्न यांचा देह कायमचा निजला. काही काळ विश्रांतीसाठी आपल्या या व्हिलावर गेलेल्या वॉर्नला त्याच्यासोबत असं काही घडेल याची कल्पनाही नव्हती. (Shane Warne Death )
मुळात तो तिथं का गेला होता आणि ते ठिकाण कोणतं होतं, असाच प्रश्न अनेक क्रीडारसिकांनी उपस्थित केला.
शेन वॉर्न असा कसा जाऊ शकतो, हाच प्रश्न वारंवार उपस्थित केला जाऊ लागला. कारण, या महान क्रीडापटूची अशी एक्झिट कोणच पचवू शकत नव्हतं.
कुठे होता, शेन वॉर्न?
थायलंडमधील Samujana Villas resort in Koh Samui मधूनच इंफिनिटी पूल दिसेल असा फोटोही त्यानं शेअर केला होता. जो पाहता, ते किती सुंदर ठिकाण असेल याचाच अंदाज सर्वांनी लावला.
जिथं वॉर्न थांबला होता, त्या Koh Samui ची खरी ओळख म्हणजे थायलंडमधील हे एक अतिशय सुंदर बेट आहे. ताडाच्या झाडांची गर्दी असणारे समुद्र किनारे आणि वर्षावनं हे इथलं मुख्य आकर्षण.
धकाधकीच्या आणि रटाळ आयुष्यातून काही निवांत क्षणांच्या शोधात असणाऱ्यांसाठी हे ठिकाण म्हणजे परवणीच.
बऱ्याचजणांच्या ट्रॅव्हल विशलिस्टवर असणारं असंच हे ठिकाण. या ठिकाणी खुद्द शेन वॉर्नही अशाच निवांत क्षणांसाठी आला होता. पण, त्याच्या नशिबात मात्र काही वेगळंच लिहून ठेवलं होतं.