ब्रिटिश मॉडेलला मारहाण केल्याचा शेन वॉर्नवर आरोप

नेहमीच चर्चेत राहणारा ऑस्ट्रेलियाचा माजी बॉलर शेन वॉर्न आता पून्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी शेन वॉर्न एका वादात अडकला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 24, 2017, 10:50 PM IST
ब्रिटिश मॉडेलला मारहाण केल्याचा शेन वॉर्नवर आरोप  title=

नवी दिल्ली : नेहमीच चर्चेत राहणारा ऑस्ट्रेलियाचा माजी बॉलर शेन वॉर्न आता पून्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी शेन वॉर्न एका वादात अडकला आहे.

लंडनमध्ये एका ब्रिटिश मॉडेलसोबत मारहाण करण्याचा आरोप शेन वॉर्नवर आहे. एका नाईट क्बलमध्ये शेन वॉर्नने एका मॉडेलला आणि अॅडल्ट फिल्मस्टारला मारहाण केली असल्याचं बोललं जात आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, शेन वॉर्नने शनिवारी रात्री लंडनमध्ये मॉडेलवर हल्ला केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत तसेच घटनास्थळावरचं सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. 

शेन वॉर्नने मारहाण केल्याने मॉडेल खाली कोसळली. पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच या घटनेसंदर्भात ट्विटरवरही आपलं मत मांडलं आहे. फॉक्सने आपल्याला मारहाण केल्याचा फोटोही अपलोड केला आहे.

फॉक्सने ट्विट करत म्हटलं की, "नाही, मी खोटं बोलत नाहीये. तुम्ही प्रसिद्ध आहात म्हणून मी हे केलेलं नाहीये. याचा अर्थ असा नाही की तुम्ही महिलांना मारहाण करुन तुमची सुटका होईल."

यासंदर्भात स्कॉटलंड यार्डने म्हटलं की, अॅडल्ट फिल्म स्टारने जे आरोप केले आहेत त्याची चौकशी सुरु आहे. अद्याप कुणालाही अटक केलेली नाहीये.