पराभवानंतर चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य; Travis Head च्या चिमुकल्या मुलीला दिली बलात्काराची धमकी, फोटो व्हायरल

Rape Threats To Travis Head Wife And Daughter: ट्रेविस हेडच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या टीमने वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर सहाव्यांदा नाव कोरलं. यानंतर ट्रेविस हेडवर कौतुंकांचा वर्षाव सुरु झाला. मात्र यावेळी टीम इंडियाच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियावर लज्जास्पद कृत्य केलं आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Nov 21, 2023, 11:01 AM IST
पराभवानंतर चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य; Travis Head च्या चिमुकल्या मुलीला दिली बलात्काराची धमकी, फोटो व्हायरल title=

Rape Threats To Travis Head Wife And Daughter: वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला आणि भारताच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. कांगारूंकडून ट्रेविस हेड हा विजयाचा खरा शिल्पकार ठरला. ट्रेविस हेडच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या टीमने वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर सहाव्यांदा नाव कोरलं. यानंतर ट्रेविस हेडवर कौतुंकांचा वर्षाव सुरु झाला. मात्र यावेळी टीम इंडियाच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियावर लज्जास्पद कृत्य केलं आहे. 

पत्नी आणि मुलीला बलात्काराची धमकी

ऑस्ट्रेलियासाठी वर्ल्डकप 2023 च्या फायनलमध्ये ट्रेविस हेडने सर्वात मोलाची भूमिका बजावली होती. टीम इंडियाने 241 रन्सच्या दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना हेडने 120 बॉल्समध्ये 15 फोर आणि 4 सिक्से मदतीने 137 रन्सची खेळी केली. दरम्यान यानंतर भारतीय चाहत्यांनी ट्रेविस हेडची पत्नी जेसिका डेव्हिस आणि मुलीला शिवीगाळ करत बलात्काराची धमकी दिलीये दिसतात. 

सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो

ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर सोशल मीडियावर काही फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेत. या फोटोंमध्ये काही चाहत्यांनी त्याची पत्नी जेसिका डेव्हिसला इंस्टाग्राम पोस्टच्या कमेंटमध्ये शिवीगाळ केलीये. याशिवाय काहींनी जेसिकाच्या फोटोंवर अतिशय अश्लील आणि असभ्य टिप्पण्या केल्यात. ज्यामध्ये बलात्काराच्या धमक्यांचाही समावेश आहे. तसंच ट्रेविसच्या एका वर्षाच्या मुलीलाही अनेकांनी बलात्काराच्या धमक्या दिल्या. पराभवानंतर चाहत्यांनी हे लज्जास्पद कृत्य केलं आहेय 

फायनल सामन्यात ट्रेविस हेडचं तुफान शतक

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत 240 रन्स केले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 6.6 ओव्हरमध्ये 47 रन्सवर 3 विकेट गमावल्या होत्या. डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर ट्रेविस हेडने मोर्चा सांभाळला. फायनलच्या सामन्यात ट्रेविस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी चौथ्या विकेटसाठी 215 बॉल्समध्ये 192 रन्सची पार्टनरशिप भागीदारी केली. अखेरील ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर एकतर्फी विजय मिळवला.