'मी त्याच्या मुलाखती पाहिल्या, तो फार...', गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतर शाहीद आफ्रिदी स्पष्टच बोलला

Shahid Afridi on Gautam Gambhir: गौतम गंभीरची (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविडचा (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याच्या जागी गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 11, 2024, 06:47 PM IST
'मी त्याच्या मुलाखती पाहिल्या, तो फार...', गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतर शाहीद आफ्रिदी स्पष्टच बोलला title=

Shahid Afridi on Gautam Gambhir: गौतम गंभीरची (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविडचा (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याच्या जागी गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे. गौतम गंभीर भारतीय संघात असताना आपल्या संतप्त स्वभावासाठी प्रसिद्ध होता. 2007 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान तो पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीला भिडला होता. या सामन्यासाठी त्यांना दंडही ठोठावण्यात आला होता. पण या वादानंत तब्बल दशकभर दोघे आमन-सामने आले नव्हते. 

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं. गौतम गंभीरची नियुक्त्ती झाल्यानंतर त्याला क्रिकेटविश्वातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. यादरम्यान त्याचा एकेकाळचा मैदानातील शत्रू शाहीद आफ्रिदीनेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गौतम गंभीरने ही संधी हक्काने मिळवली आहे असं कौतुक त्याने केलं आहे. 

'मी त्याच्या मुलाखती पाहिल्या आहेत'

"मला वाटतं ही मोठी संधी आहे. तो आता या संधीचं सोनं कसं करतो हे पाहावं लागणार आहे. मी त्याच्या मुलाखती पाहिल्या आहेत. तो सकारात्मक आणि स्पष्टपणे बोलतो," असं शाहीद आफ्रिदीने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं.

दरम्यान भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स संघाची सोबत सोडली आहे. 2024 च्या हंगामात गौतम गंभीर कोलकाता संघाचा मेंटॉर होता. मेंटॉर झाल्यानंतर पहिल्याच हंगामात गौतम गंभीरने कोलकाता संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली आहे. 

मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडच्या अंतिम टप्प्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने T20 विश्वचषक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ मोठ्या उंचीवर संपल्यानंतर लगेचच गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरकडे पहिला जबाबदारी भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका असेल.

'माझ्या देशाची सेवा करणे हा एक सन्मान'

"माझा तिरंगा, माझ्या लोकांची, माझ्या देशाची सेवा करणे हा एक सन्मान आहे. मी राहुल द्रविड आणि त्याच्या सपोर्ट स्टाफच्या टीमचे यशस्वी कामगिरीबद्दल अभिनंदन करतो. टीम इंडियासाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका साकारताना मी सन्मानित आणि उत्साही आहे,” असं गौतम गंभीर म्हणाला आहे.