‘What is this’ म्हणत दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी संतापला

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी कोणावर आणि एवढा का संतापला?

Updated: Jul 8, 2021, 12:07 AM IST
‘What is this’ म्हणत दिग्गज क्रिकेटपटू  शाहिद आफ्रिदी संतापला title=

मुंबई: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान संघाबद्दल मोठे विधान केलं. त्यांचा असा विश्वास आहे की आता पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघासाठी खेळणे खूपच सोपं झालं आहे. इतकच नाही तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही हंगाम घालवल्यानंतरच संघात खेळाडूंची निवड केली पाहिजे असाही दावा त्याने केला आहे.

लिमिटेड ओव्हरमध्ये खेळताना पाकिस्तानच्या संघात पदार्पण करणाऱ्यांवर आणि खेळाडू बदलल्या प्रकरणी शाहिद आफ्रिदी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डवर संताप व्यक्त केला आहे. 'राष्ट्रीय संघात खेळणं आता खूपच सोपं झालं आहे. पूर्वी पाकिस्तान संघाकडून खेळण्यासाठी व्यवसायिक क्रिकेटमध्ये सर्वोच्च स्थानी पोहोचल्यानंतर पाकिस्तानी संघात खेळण्याची संधी मिळत होती. 

अनुभव कमी असलेल्या खेळाडूंना देखील पाकिस्तानी संघात अगदी सहपणे खेळण्याची संधी दिली जाते. पूर्वी खेळाडू तावून सुलाखून घेतले जात होते. आता जेवढ्या लवकर संघात निवड होते तेवढ्याच वेगात खेळाडूला बाहेरचा रस्ताही दाखवला जातो. 

धक्कादायक! भारतीय क्रिकेटपटूकडून वृद्धाला मारहाण, कोण आहे तो खेळाडू?

शाहीद आफ्रदी क्रिकेट बोर्डवर चांगलाच संतापला आहे. शाहीदच्या म्हणण्यानुसार निवड करण्याआधी खेळाडूंना घरच्या मैदानात किमान दोन ते तीन वर्ष खेळून आपली कामगिरी दाखवायला हवी. हा अनुभव घेतल्यानंतरच त्यांना पाकिस्तान क्रिकेट संघात खेळण्याची संधी मिळायला हवी. 

देशाचं प्रतिनिधित्व करणं ही गोष्ट खेळाडूंसाठी एवढी साधी सोपी का करून दिली आहे. मला हे पाहून खूप वाईट वाटतं की एक दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून खेळाडूंची निवड थेट पाकिस्तानच्या मुख्य संघासाठी केली जाते. जेवढा अनुभव जास्त त्याचा मैदानात फायदाही जास्त होतो. त्यामुळे दोन ते तीन वर्ष खेळाडूंनी घरच्या मैदानात खेळूनच नंतर संधी द्यायला हवी असंही यावेळी शाहीद आफ्रिदी म्हणाला.