ऑस्ट्रेलिया T20 लीगमध्ये खेळताना दिसणार 2 धुरंधर भारतीय महिला खेळाडू

ऑस्ट्रेलिया टी 20 लीग वुमन्स बिग बॅशमध्ये भारतीय महिला तीन धुरंधर खेळाडू त्यांच्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 

Updated: May 13, 2021, 04:13 PM IST
ऑस्ट्रेलिया T20 लीगमध्ये खेळताना दिसणार 2 धुरंधर भारतीय महिला खेळाडू  title=

मुंबई: टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपसाठी 18 ते 22 जून इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया टी 20 लीग वुमन्स बिग बॅशमध्ये भारतीय महिला तीन धुरंधर खेळाडू त्यांच्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. भारतीय महिला संघातील विस्फोटक ओपनर शेफाली वर्मा आणि राधा यादव देखील डेब्यू करणार आहेत. 

क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार हरियाणा क्रिकेट असोसिएशनच्या सहमतीनं आणि पुढाकारानं बीसीसीआयने शेफाली वर्माला ऑस्ट्रेलिया टी 20  वुमन्स बिग बॅशमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. 

आतापर्यंत या लीगमध्ये केवळ 3 महिलांना खेळण्याची परवानगी मिळाली होती. हरमनप्रीत कौर, स्मृति मंधाना वेदा कृष्णमूर्ति या तिघांना परवानगी होती. आता शेफाली वर्मा आणि राधा यादव या दोघी खेळताना दिसणार आहेत. हरमनप्रीत कौर सिडनी थंडर टीमचा भाग आहे. तर मंधाना ब्रेसबेन हिट तर वेदा सीजन हरिकेन टीमकडून खेळणार आहे. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत पहिली भेट कुठे झाली? धोनीनं सांगितला किस्सा

शेफाली वर्माने इंग्लंडच्या 100 लीगमध्ये खेळण्यासाठी देखील करार केला आहे. ही स्पर्धा 100 चेंडूची असते. या लीगमध्ये देखील शेफालीसोबत हरमनप्रीत, मंधाना, दिप्ती शर्मा खेळताना दिसणार आहेत. याची सुरुवात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणार असल्याचं सांगितलं जात आहे.