'भावा लग्न कर, आता तुझं वय झालं', कर्णधार बाबर आझमला माजी क्रिकेटरने दिला सल्ला

बांगलादेश विरुद्ध सिरीजमध्ये बाबर आझमकडून चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा होती मात्र त्याला अर्धशतकावर समाधान मानावे लागले. बाबरवर एकेकाळी कौतुकाचा वर्षाव करणारे पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू आता त्याच्यावर टीका करताना दिसतं आहेत. 

पुजा पवार | Updated: Sep 7, 2024, 04:58 PM IST
'भावा लग्न कर, आता तुझं वय झालं', कर्णधार बाबर आझमला माजी क्रिकेटरने दिला सल्ला   title=
( Photo Credit : Social Media )

Former Cricketer Basit Ali On Babar Azam : पाकिस्तानच्या टी 20 संघाचा कर्णधार बाबर आझमला त्याच्या वाईट फॉर्ममुळे ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आहे. बांगलादेश सोबत घरच्या टेस्ट सिरीजमध्ये पाकिस्तानची 2-0 ने लाजिरवाणी हार झाली. बाबर आझम सध्या वाईट फॉर्ममधून जात असून मागील काही सामन्यांमध्ये तो समाधानकारक धावा करू शकलेला नाही. बांगलादेश विरुद्ध सिरीजमध्ये बाबर आझमकडून चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा होती मात्र त्याला अर्धशतकावर समाधान मानावे लागले. बाबरवर एकेकाळी कौतुकाचा वर्षाव करणारे पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू आता त्याच्यावर टीका करताना दिसतं आहेत. 

बाबर आझमच्या खराब फॉर्ममुळे पाकिस्तानचे माजी क्रिकेटर बासित अली (Basit Ali) यांनी त्याच्यावर कोचक टीका केली. बासित यांनी बाबरला अजब सल्ला देत म्हंटले की, "बाबरला आता लग्न करायला हवं कारण लग्नानंतर व्हाईट बॉल क्रिकेटचा कर्णधार कोणी वेगळा असेल". बाबरने टेस्ट क्रिकेटच्या मागील 11 संनयनमध्ये 20.36 च्या सरासरीने 224 धावा केल्या आहेत. 

बासित अली नेमकं काय म्हणाले? 

बासितने आपल्या युट्युब चॅनेलवर बोलताना म्हंटले की, "बाबर आझमने आपल्या आई वडिलांशी बोलावे आणि लग्न करावे. त्यानंतर तो अतिशय वेगळा व्यक्ती होईल. मला माहितीये की जेव्हा खेळाडू चांगलं प्रदर्शन करत नाही तेव्हा त्याला काय वाटत असतं. मी बाबरच्या आई वडिलांना सांगू इच्छितो की त्याचे लग्न करून टाका. एका मोठ्या भावाप्रमाणे, मला वाटतं की ते त्याला म्हणतील की, भावा लग्न कर, आता तुझं वय झालं".  

हेही वाचा : कोण म्हणतं रोहित शर्मा अनफिट? 'हा' Video एकदा पाहाच! Hitman ला कराल सलाम

मोहम्मद रिझवान होणार पाकिस्तानचा नवा कर्णधार? 

बाबर आझम सध्या पाकिस्तानचा वनडे आणि टी 20 संघाचा कर्णधार आहे. मात्र त्याच्याकडून टेस्ट संघाचे कर्णधारपण परत घेण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानच्या टेस्ट संघाचे नेतृत्व सध्या शान मसूद करत आहे. मसूदच्या नेतृत्वात पाकिस्तानने सलग 5 टेस्ट सामने हरले आहेत. बाबरचा फॉर्म पाहून असं म्हटल जातंय की चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी बाबरकडून लिमिटेड ओव्हर फॉरमॅटचे कर्णधारपद सुद्धा काढून घेतले जाईल. बाबर आझम ऐवजी वॆतकीपर फलंदाज मोहम्मद रिझवानकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते.