सरफराजचा 'स्कूप शॉट' पाहून पंजाबची बोलती बंद, पाहा व्हिडीओ

6-4-4-4-4 सरफराजकडून बॉलर्सची धुलाई, 'स्कूप शॉट'नं सगळेच हैराण पाहा व्हिडीओ

Updated: May 17, 2022, 08:22 AM IST
सरफराजचा 'स्कूप शॉट' पाहून पंजाबची बोलती बंद, पाहा व्हिडीओ  title=

मुंबई : पंजाब विरुद्ध दिल्ली झालेल्या सामन्यात सरफराज खाननं कमाल केली. सरफराज खानने दिल्लीकडून खेळताना कमी बॉलमध्ये जास्त धावा केल्या. त्याने अनोख्या अंदाजात स्कूप शॉट खेळला. ज्यामुळे चाहत्यांची मनं जिंकली तर पंजाबचे खेळाडू तोंडात बोट घालून हैराण होऊन पाहात राहिले. 

सरफराजने 16 बॉलमध्ये 32 धावांची खेळी केली. ज्यात 5 चौकार आणि एक षटकार ठोकला आहे. अर्शदीपने सरफराज खानला बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 

5 व्या ओव्हरमध्ये सरफराजला तंबुत परतावं लागलं. सरफराज षटकार ठोकण्याच्या तयारीत होता मात्र तो कॅच आऊट झाला. त्याने खेळलेल्या स्कूप शॉटनं सगळेच हैराण झाले आहेत. 

सरफराजने स्कूप शॉट खेळला तो पाहून सगळेच हैराण झाले. या स्कूप शॉटची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर खूप व्हायरल झलाा आहे. 

दिल्लीला पहिला झटका डेव्हिड वॉर्नर आऊट झाल्यानंतर लागला. वॉर्नर 2014 नंतर पहिल्यांदा गोल्डन डक झाला. त्यामुळे दिल्लीला मोठा धक्का बसला आहे. वॉर्नरची बॅट चालली असती तर पंजाबचं काही खरं नव्हतं. 

पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीने 17 धावांनी विजय मिळवला आहे. डी वाय पाटीलवर झालेल्या या सामन्यात पंजाबने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. दिल्लीने 7 गडी गमावून 159 धावा केल्या. पंजाब समोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाब टीमला 142 धावा करता आल्या. दिल्लीचा 17 धावांनी विजय झाला.