Sara Tendulkar : 'या' ठिकाणी सारा-शुभमन करतायत हॉलिडे एन्जॉय, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

 Sara Tendulkar : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर शुभमन गिल ( Shubman Gill ) भारत आगामी स्पर्धेपूर्वी लंडनला सुट्टी एन्जॉय करतो. अशातच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) देखील सुट्ट्यांचा आनंद घेतेय. पुन्हा एकदा हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. 

Updated: Jun 17, 2023, 08:12 PM IST
Sara Tendulkar : 'या' ठिकाणी सारा-शुभमन करतायत हॉलिडे एन्जॉय, फोटो सोशल मीडियावर व्हायरल title=

Sara Tendulkar : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर ( ICC World Test Championship ) टीम इंडियातील अनेक खेळाडू वेगवेगळ्या ठिकाणी सुट्टीसाठी गेले आहेत. पुढील जवळपास एक महिना टीम इंडियाच्या खेळाडूंना कोणताही दौरा नाहीये. नुकतात भारताचा ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दारूण पराभव केला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) अंतिम फेरीत टीम इंडियाचा स्टार युवा खेळाडू शुभमन गिल अपयशी ठरला होता. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर शुभमन गिल ( Shubman Gill ) भारत आगामी स्पर्धेपूर्वी लंडनला सुट्टी एन्जॉय करतो. अशातच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) देखील सुट्ट्यांचा आनंद घेतेय.  

सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) दोघंही सुट्टीचा आनंद घेत असल्याने पुन्हा एकदा हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. 

शुभमन आणि सारा डेट करत असल्याची कथित चर्चा

गेल्या अनेक महिन्यांपासून शुभमन गिल ( Shubman Gill ) आणि सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) एकमेकांना डेट करत असल्याची कथित चर्चा आहे. कधी दोघांचे एकाच हॉटेलमधील सारखे फोटो असो किंवा स्टेडियममध्ये साराच्या नावाने शुभनमला चिडवणं असो. याशिवाय सोशल मीडियावरही हे दोघं एकमेंकासोबत असल्याचं म्हटलं जातं. 

आयपीएल, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप यामध्ये शुभमन ( Shubman Gill ) आणि साराची चर्चा होतीच. दरम्यान आता ते दोघे फिरायला गेले आहेत आणि त्यामुळे चर्चा अजूनच वाढलीये. पण शुभमन गिल ( Shubman Gill ) आणि सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) एकत्र फिरायला गेलेले नाहीत, ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले आहेत.

सारा केनियामध्ये घेतेय वेकेशनचा आनंद

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना इंग्लडमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान सारा ( Sara Tendulkar ) लंडनमध्ये होती. मात्र आता सुट्टीचा आनंद घेण्यासाठी ती केनियामध्ये गेलीये. साराने मसाई मारा नॅशनल पार्कलाही भेट दिली. यावेळी तिने यासंदर्भातील फोटो शेअर केला. 

शुभमन गिल इशानसोबत फिरण्यात मग्न

शुभमन गिल ( Shubman Gill ) सध्या इशान किशनसोबत फिरताना दिसतोय. शुभमनने स्वतःचा ट्रेनमधला प्रवास करतानाचा फोटोही शेअर केला आहे. शुभमन आणि सारा वेगवेगळ्या ठिकाणी असले तरी फॅन्स ते एकत्र असल्याची कमेंट करतायत. दरम्यान शुभमन ( Shubman Gill ) किंवा सारा या दोघांपैकी कोणीही त्यांच्यातील नात्याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे यांचं अफेअर असल्याची निव्वळ कथित चर्चा आहे.