थायलंडमध्ये फडकला तिरंगा, साई प्रणित बनला चॅम्पियन

भारतीय बॅडमिंटन स्टार साई प्रणितनं थायलंड ओपनवर आपलं नाव कोरलं. त्यानं फायनलमध्ये इंडोनेशियाच्या चौथ्या मानांकित जोनाटन ख्रिस्टीचा 17-21, 21-18, 21-19 अशा चित्तथरारक लढतीत पराभव केला. 

Updated: Jun 4, 2017, 09:42 PM IST
थायलंडमध्ये फडकला तिरंगा, साई प्रणित बनला चॅम्पियन title=

बँकॉक : भारतीय बॅडमिंटन स्टार साई प्रणितनं थायलंड ओपनवर आपलं नाव कोरलं. त्यानं फायनलमध्ये इंडोनेशियाच्या चौथ्या मानांकित जोनाटन ख्रिस्टीचा 17-21, 21-18, 21-19 अशा चित्तथरारक लढतीत पराभव केला.

साई प्रणितनं सिंगापूर ओपननंतर लगेच थायलंड ओपन जिंकण्याची किमया साधली. पहिला गेम गमावल्यानंतर त्यानं जोरदार कमबॅक करत दुसरा आणि तिसरा गेम जिंकला. दरम्यान, साई प्रणितनं सेमी फायनलपर्यंत एकही गेम गमावला नव्हता. फायनलमध्ये त्याला पहिल्यांदाच एक गेम गमवावा लागला.