कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरमध्ये कसोटी सुरू आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस सुरु आहे. भारतीय संघाची गोलंदाजी सध्या सुरू आहे. मात्र याच दरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. तिसऱ्या दिवशी विकेटकीपर वृद्धिमान साहा विकेट कीपिंगसाठी मैदानात आला नाही, त्याच्या जागी के.एस. भरतला विकेटकीपिंगसाठी यावं लागलं.
दरम्यान यासंदर्भात बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या माहितीनुसार, रिद्धिमान साहाला मानेचा त्रास झाला आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर उपचार आणि देखरेख करत आहे. साहा यांच्या अनुपस्थितीत के.एस. भरत विकेटकीपिंग करणार आहे.
या मालिकेत भारताचा मुख्य विकेटकीपर ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळेच ऋद्धिमान साहाची निवड करण्यात आली होती. त्याचसोबतच बॅक-अप म्हणून के.एस. भरत याला ठेवण्यात आलं आहे.
UPDATE - Wriddhiman Saha has stiffness in his neck. The BCCI medical team is treating him and monitoring his progress. KS Bharat will be keeping wickets in his absence.#INDvNZ @Paytm
— BCCI (@BCCI) November 27, 2021
केएस भरतने जरीआतापर्यंत टीम इंडियासाठी पदार्पण केलं नसलं देशांतर्गत क्रिकेट आणि नंतर आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलीये. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, भरतने 78 सामने खेळले आहेत आणि 4283 धावा केल्या आहेत. भरतच्या नावावर 9 शतकं आहेत, तर त्याची सर्वाधिक धावसंख्या 308 आहे.
कानपूर कसोटीत टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर टीम इंडियाने 345 धावांची मोठी धावसंख्या उभारली. पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने पहिल्या डावातच शतक झळकावलं, पण नंतर न्यूझीलंड संघाच्या ओपनर्सने चांगली सुरुवात करून दिली आहे.