VIDEO : हॉकीनंतर साडी नेसून फुटबॉल खेळताना दिसली सागरिका

भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान गेल्या वर्षी बॉलीवूड अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्याशी विवाहबद्ध झाला. 

Updated: May 15, 2018, 01:03 PM IST
VIDEO : हॉकीनंतर साडी नेसून फुटबॉल खेळताना दिसली सागरिका title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान गेल्या वर्षी बॉलीवूड अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्याशी विवाहबद्ध झाला. लग्नानंतर सागरिका घाटगे पुन्हा कामाकडे वळलीये. २००७मध्ये आलेल्या शाहरुख खान स्टारर चक दे इंडियामध्ये तिने एका हॉकीपटूची भूमिका निभावली होती. हॉकीनंतर सागरिका आता फुटबॉल खेळताना दिसणार आहे. लग्नानंतर ती आता मान्सून फुटबॉल या सिनेमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करतेय. मान्सून फुटबॉल हा मराठी सिनेमा आहे. या सिनेमात सागरिका घाटगे एका मध्यमवर्गीय गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. मान्सून फुटबॉल हा सिनेमा के. उके दिग्दर्शित करतायत. ही एका गृहिणीची कहाणी आहे जिला खुलेपणाने आपले आयुष्य जगायचे आहे. मान्सून फुटबॉलमध्ये सागरिका मुख्य भूमिकेत आहे. ॉ

 

Saree soccer #sagarikaghatge at her new film launch

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

या सिनेमात ती साडी नेसून फुटबॉल खेळताना दिसणार आहे. या सिनेमात मध्यमवर्गीय गृहिणी आणि तिच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर आहे. या सिनेमाचे शूटिंग जुलैमध्ये सुरु होणार आहे. मात्र सागरिकाने या सिनेमाची तयारी आतापासूनच सुरु केलीये.