Saeed Ajmal On Sachin Tendulkar: महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 च्या विश्वचषक (World Cup 2011) खेळला गेला. घरच्या मैदानावर भारताने वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला होता. भारताने सेमीफायनल (WC 2011 Semifinal) सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. अशातच भारत विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याबाबत बोलताना सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) विरोधात पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमल (Saeed Ajmal) याने एका निर्णयाबाबत खळबळजनक दावा केला आहे.
भारत पाकिस्तान सामन्यात (IND vs PAK) सचिन तेंडुलकर 23 धावांवर खेळत असताना ही घटना घडली. त्याचवेळी सईदचा एक चेंडू सचिनच्या पॅडला लागला की तो स्टंपच्या अगदी समोर होता. त्यामुळे अंपायरने सचिनला आऊट दिलं. मात्र, सचिनने त्यावेळी थर्ड अंपायरकडे अपिल करण्यात आली. त्यावेळी थर्ड अंपायरने सचिनला नॉट आऊट दिला. त्यावरून मोठा वाद देखील झाला होता. त्यावर आता 12 वर्षांनी सईद अजमलने (Saeed Ajmal) खळबळजनक दावा केला आहे.
मोहली येथे खेळवला गेलेला हा सामना दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा होता. तुम्हाला सचिनची ती विकेट आठवत असेल तर मी अजूनही म्हणेन की सचिन आऊट होता. थर्ड अंपायरने दाखवलेला व्हिडिओच्या शेवटच्या दोन फ्रेम्स कट झाल्या होत्या, त्यामुळे चेंडू लेग स्टंपला चुकला. या दोन्ही फ्रेम दाखविल्या असत्या तर चेंडू थेट मधल्या यष्टीवर आदळला असता, असं सईद अजमल म्हणालाय. त्यावेळी त्याने सचिनला वाचवण्यासाठी या रिप्लेच्या शेवटच्या दोन फ्रेम्स कापल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
आणखी वाचा - IND vs PAK सामन्यापूर्वी सौरव गांगुलीचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाला...
दरम्यान, या सामन्यात सचिन तेंडुलकरने 115 चेंडूत 85 धावा केल्या होत्या. त्यामुळे टीम इंडियाला मोठी मजल मारता आली. भारताने निर्धारित 50 षटकात 9 विकेट गमावत 260 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा संघ 231 धावांवर ऑलआऊट झाला होता. भारताने दिमाखात हा सामना जिंकला होता. आता आगामी वर्ल्ड कप सामन्यापूर्वी सईद अजमलने जुना राग उखडून काढला आहे.