मुंबई : टीम इंडियामध्ये बुमराह आणि शमी सारखे घातक प्लेअर आहेत. मात्र शमी आणि बुमराहपेक्षाही सर्वश्रेष्ठ खेळाडू कोण असा प्रश्न जेव्हा सचिन तेंडुलकरला विचारण्यात आला तेव्हा उत्तर अनपेक्षित होतं. सचिनच्या दृष्टीनं वेगळाच खेळाडू सर्वश्रेष्ठ आहे. त्याने यामागचं कारणही सांगितलं आहे.
सचिनने हर्षल पटेल सर्वश्रेष्ठ बॉलर असल्याचं सांगितलं. 31 वर्षांचा हर्षल पटेल आयपीएलमध्ये बंगळुरू टीमकडून खेळतो. यंदाच्या हंगामात त्याने उत्तम कामगिरी केली आहे.
हर्षल पटेलने 2021 मध्ये 15 सामन्यात 32 विकेट्स घेतल्या आणि पर्पल कॅम मिळवली. बंगळुरू टीममधील सर्वश्रेष्ठ बॉल म्हणून त्याची वेगळी ओळख आहे. 27 धावा देऊन त्याने एका सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत. ऑक्शनमध्ये 10.75 कोटी रुपये देऊन त्याला बंगळुरूने पुन्हा आपल्या टीममध्ये घेतलं.
यंदाच्या हंगामात हर्षल पटेलने 12 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या करिअरमध्ये 96 विकेट्स घेतल्या आहेत. तोच प्लेऑफपर्यंत टीमला पोहोचवू शकतो असा बंगळुरूला भरवसा आहे.
हर्षल पटेल एक मौल्यवान खेळाडू म्हणून पुढे येऊ शकतो डेथ ओव्हरमध्ये त्याचं कौशल्य आणि कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरच्या दृष्टीनं तो आयपीएलमध्ये सर्वश्रेष्ठ खेळाडू असल्याचं त्याने सांगितलं.
हर्षलचं बॉलिंग स्किल पाहिलं तर ते प्रत्येक सामन्यात सुधारलेलं दिसतं. तो आपलं वैविध्य लपवू शकतो. त्याला डेथ ओव्हर्ससाठी सर्वोत्तम बॉलर ठरू शकतो असा विश्वास सचिन तेंडुलकरने आपल्या युट्यूब चॅनलवर व्यक्त केला आहे.