क्रिकेटच्या देवाला पाहून रडू लागला दिव्यांग क्रिकेटर, सचिनने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

क्रिकेटचा देव समजला जाणारा टिम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर सध्या काश्मीर दौऱ्यावर आहे. मास्टर ब्लास्टर येथे स्थानिक लोकांसोबत क्रिकेट खेळताना दिसला होता. काश्मीरचे फोटो, व्हिडीओ शेअर करतोय. त्यात त्याने आणखी एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. असं काय आहे या व्हिडीओत? जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 24, 2024, 02:03 PM IST
क्रिकेटच्या देवाला पाहून रडू लागला दिव्यांग क्रिकेटर, सचिनने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील title=
Sachin Tendulkar Meet Aamir Husain

Sachin Tendulkar: क्रिकेटचा देव समजला जाणारा टिम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर सध्या काश्मीर दौऱ्यावर आहे. मास्टर ब्लास्टर येथे स्थानिक लोकांसोबत क्रिकेट खेळताना दिसला होता. काश्मीरचे फोटो, व्हिडीओ शेअर करतोय. त्यात त्याने आणखी एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. असं काय आहे या व्हिडीओत? जाणून घेऊया. 

क्रिकेटचा देव त्याच्या फॅन्सला आणि खऱ्या आयुष्यातील हिरोला भेटतोय, तो हा क्षण आहे. सचिन तेंडुलकरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो काश्मिरचा दिव्यांग क्रिकेटर आमिर हुसैनला भेटलाय. आमिरला दोन्ही हात नाहीयत. तो मान आणि खांद्यामध्ये बॅट  अडकवून बॅटींग करतो. काही दिवसांपुर्वी सोशल मीडियात आमिरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी त्याचे कौतुक सचिन तेंडुलकरने केले होते. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या व्हिडीओत आमिरसोबत गप्पा मारताना दिसत आहे. सचिन आमिरच्या हिंमतीची दाद देतोय आणि त्याला तू खरा हिरो असल्याचं सांगतोय. सचिनला भेटण्यासाठी आणि त्याच्या तोंडून आपले कौतुक ऐकून आमिर भावूक झाल्याचे दिसतोय. 

सचिनने दिलं खास गिफ्ट 

सचिनने आमिरसोबत बसून बराच वेळ गप्पा मारल्या. त्याच्या संघर्षाबद्दल खूप काही जाणून घेतलं. यासोबतच क्रिकेटच्या देवाने आपल्या जबरा फॅन्सला खास गिफ्टदेखील दिलं. सचिनने आमिरला एक बॅट गिफ्ट केली. तसेच आमिरसोबत आपला आवडता कव्हर ड्राइव्ह शॉट खेळताना सचिन दिसतोय. 

सचिनने दिला होता शब्द 

आमिर हुसैनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात सचिन तेंडुलकर आपला आदर्श असल्याचे त्याने म्हटले होते. यानंतर मास्टर ब्लास्टरने ट्विट करत आमिरचे खूप कौतुक केले होते. आपण लवकरच आमिरला भेटू असा शब्द त्याने दिला होता. यानंतर सचिनने आमिरची भेट घेतली.