Rohit Sharma: रोहितला MI कॅप्टन्सीवरून हटवण्यामागे सचिन तेंडुलकरचा हात? क्रिकेटच्या देवावर का होतोय आरोप?

Rohit Sharma: अशातच आता रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्यामागे महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा हात असू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. यामागे अनेक प्रकारचे तर्कवितर्क लावले जात आहेत.

सुरभि जगदीश | Updated: Mar 19, 2024, 10:29 PM IST
Rohit Sharma: रोहितला MI कॅप्टन्सीवरून हटवण्यामागे सचिन तेंडुलकरचा हात? क्रिकेटच्या देवावर का होतोय आरोप? title=

Rohit Sharma: येत्या 22 तारखेपासून इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक मोठे बदल पहायला मिळाले आहेत. पाचवेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने आयपीएलपूर्वी मोठा निर्णय घेतला असून रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. मॅनेजमेंटचा हा निर्णय अनेक चाहत्यांना खटकला होता. दरम्यान रोहितला कर्णधारपदावरून हटण्यामागे अनेक मोठे दावे करण्यात येतायत.

मुंबईने लीगच्या 17 व्या सिझनसाठी ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलंय. हार्दिक दोन सिझनसाठी गुजरात टायटन्स (GT) मध्ये गेला आणि पहिल्याच वेळी त्याने टीमला चॅम्पियन बनवलं. आयपीएल 2024 च्या आधीही हार्दिक आणि मुंबई यांच्यात करार झाला होता. 

रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईसाठी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. गेल्या दशकापासून रोहित या फ्रँचायझीचे नेतृत्व करत होता. मात्र अचानक त्याला कर्णधारपदारून हटवण्यात आलं. दरम्यान अशातच आता रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्यामागे महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा हात असू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. यामागे अनेक प्रकारचे तर्कवितर्क लावले जात आहेत.

रोहितला हटवण्यामागे सचिनचा हात?

'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा मार्गदर्शक आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो, पण जोपर्यंत रोहित टीमचा कर्णधार होता, तोपर्यंत अर्जुनला प्लेइंग-11 मध्ये फारशी संधी देण्यात आली नव्हती.

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून त्याने असा दावा केला आहे की, , "सचिन आणि रोहित यांच्यातील संबंध गेल्या दोन वर्षांपासून सर्व काही फारसे चांगले नाही. कदाचित सचिनचा मुलगा अर्जुनला मुंबई इंडियन्समध्ये फारशी संधी मिळत नसल्याने हे घडत असावं. आयपीएल 2023 मध्येही अर्जुनला केवळ 4 सामन्यांनंतर टीमधून वगळण्यात आले होते. याशिवाय सचिन इतर खेळाडूंबाबत सोशल मीडियावर पोस्ट करतो, मात्र रोहित शर्मासंदर्भात कधीच करत नाही." 

या व्यक्तीने पुढे असं म्हटलंय की, "सचिन तेंडुलकर काही काळापासून रोहित शर्मा वगळता सर्व खेळाडूंच्या कामगिरीवर पोस्ट करतोय. तसंच, रोहितच्या वाढदिवशीही मास्टर ब्लास्टर 'हिटमॅन'ला जाहीरपणे शुभेच्छा देत नाही. रोहितने बांगलादेशविरुद्ध नाबाद 51, वर्ल्डतकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध 86, अफगाणिस्तानविरुद्ध 133 आणि इंग्लंडविरुद्ध 87 रन्स केले, तेव्हाही सचिनने रोहितसाठी एकही ट्विट केलं नाही, तर कोहली आणि गिलसाठी तो नेहमी ट्विट करतो. 

( सोशल मीडियावर केलेल्या दाव्यावरून ही माहिती देण्यात आली असून झी 24 याला सत्य मानत नाही )