सचिनचा 45 वा वाढदिवस वानखेडेवर असा झाला साजरा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा काल 45 वा वाढदिवस साजरा झाला. 

सचिनचा 45 वा वाढदिवस वानखेडेवर असा झाला साजरा  title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा काल 45 वा वाढदिवस साजरा झाला. सकाळपासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. गेल्या वर्षी सचिनचा वाढदिवस वानखेडे स्टेडिअमवर साजरा झाला होता. यंदा देखील हा वाढदिवस वानखेडे स्टेडिअममध्ये साजरा करण्यात आला. मुंबई इंडियन्स विरूद्ध श्रीलंकेविरूद्ध हा सामना रंगला होता. 

वानखेडे स्टेडिअमवर सचिनचा 45 वा वाढदिवस एकदम उत्साहात साजरा केला गेला. यावेळी उपस्थित असलेल्या 33 हजार प्रेक्षकांच्यासोबतीने हा वाढदिवस साजरा झाला. यावेळी चाहत्यांनी एकाचवेळी 'हॅप्पी बर्थ डे टू यू सचिन' असं एका सुरात म्हणत सचिनला वाढदिवसाच्या एकत्र शुभेच्छा द्यायला सुरूवात केली. यावेळी सचिनचा जबरा फॅन सुधीरने भारताचा झेंडा फडकवत आपला आनंद व्यक्त केला. 

तसेच बर्थ डे विश केल्यानंतर चाहत्यांनी एकाच सुरात सचिन सचिन अशा घोषणा द्यायला सुरूवात केली. आणि संपूर्ण वानखेडे स्टेडिअममध्ये सचिनच्या नावाचा जयघोष सुरू झाला. 

सचिनचा वाढदिवस ही एक चाहत्यांसाठी पर्वणीच असते. कारण प्रत्येकजण हा दिवस आपला आवडीचा दिवस म्हणून साजरा केला जातो.