मुंबई : आयपीएलच्या ११व्या हंगामात आज भारताचे आजी-माजी कर्णधार आमनेसामने असणार आहेत. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज बंगळूरु आणि चेन्नई या दोन संघामध्ये सामना होणार आहे. चेन्नईचा संघ गेली दोन वर्षे बंदीमुळे खेळला नव्हता. त्यामुळे चिन्नास्वामी स्टेडियमवर या सामन्याची उत्सुकता दोन्ही कर्णधारांच्या चाहत्यांना आहे. दोन वर्षांनी पुनरागमन करणारा चेन्नईचा संघ यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत खेळण्यात आलेल्या पाच सामन्यांपैकी चेन्नईने चार सामन्यांत विजय मिळवलाय.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बंगळूरु संघाने पाच पैकी केवळ दोन सामन्यांत विजय मिळवलाय. गेल्या आठवड्यात घरच्या मैदानावर दिल्लीला हरवल्यानंतर बंगळूरुचा आत्मविश्वास वाढलाय. विजयाची हीच लय कायम ठेवण्याचा प्रयत्न ते करतील.
डी विलियर्स चांगल्या फॉर्म आहे त्यामुळे बंगळूरुसाठी ही जमेची बाजू आहे. गेल्या सामन्यात त्याने ३९ चेंडूत ९० धावा करताना दिल्लीविरुद्ध संघाला शानदार विजय मिळवून दिला होता.
चेन्नईचा संघा पाहिल्यास त्यांचे फलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत. शेन वॉटसन, अंबाती रायडू, सुरेश रैना, धोनी, ड्वायेन ब्रावो हे सगळे फलंदाज चांगली कामगिरी करतायत. त्यामुळे धोनीच्या संघाासाठी ही जमेची बाजू आहे.
सामन्याची वेळ - रात्री ८ वाजता.