तुम्हाला विश्वास बसणार नाही, या खेळाडूनं सौरव गांगुली यांना दिली करियर संपवण्याची धमकी

क्रिकेट विश्वाचा दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांगुली यांना करियर संपवण्याची नेमकी कुणी आणि का दिली धमकी?

Updated: Jun 8, 2021, 02:53 PM IST
तुम्हाला विश्वास बसणार नाही, या खेळाडूनं सौरव गांगुली यांना दिली करियर संपवण्याची धमकी title=

मुंबई: क्रिकेटमधील सर्वात शांत आणि उत्तम फलंदाजी करणारं व्यक्तीमत्त्व म्हणजे सौरव गांगुली यांना चक्क एका खेळाडूनं करियर संपवण्याची धमकी दिली होती. हे वाचून एक क्षण तुम्हालाही विश्वास बसणार नाही. पण ही घटना खरी आहे. शांत आणि संयमी असलेल्या सौरव गांगुली यांना चिडलेल्या खेळाडूनं करियर संपवण्याची धमकी दिली. असं नेमकं काय घडलं होतं कुणी दिली धमकी याचा खुलासा सौरव गांगुली यांनी स्वत: एका मुलाखतीदरम्यान केला आहे. 

कोणी आणि का दिली गांगुली यांना धमकी?

सचिन तेंडुलकर कर्णधार होता तेव्हा 1997 मध्ये वेस्टइंडिज दौऱ्यादरम्यान हा प्रकार घडला होता. वेस्टइंडिज विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला 38 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे टीम इंडियाच्या हातून टेस्ट सीरिज गेली आणि वेस्ट इंडिज 0-1ने विजयी झाला. बारबाडोसमध्ये कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताला 120 धावांची त्यावेळी गरज होती. 

वेस्टइंडिज दौऱ्यादरम्यान नेमकं काय घडलं?

सचिन तेंडुलकरला ही सीरिज जिंकू असा पूर्ण विश्वास होता. त्याने रेस्तराच्या मालकाला विजयाची पार्टी आयोजित करण्यासही सांगितलं होतं. मात्र चौथ्या डावात टीम इंडिया 81 धावा करून ऑलाऊट झाली. भारत हा सामना 38 धावांनी पराभूत झाला त्यावेळी सचिन तेंडुलकर खूप संतापला होता. त्याचा राग अनावर झाला होता. 

सचिन तेंडुलकर का संतापला?

सचिन तेंडुलकरचा राग शांत करण्यासाठी सौरव गांगुली त्याच्या रूममध्य गेले. त्यावेळी सचिननं दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकला एकत्र जाण्याबाबत सांगितलं. मॉर्निंग वॉक दरम्यान संघाबद्दल बोलायचं असावं अशा उद्देशानं सचिननं त्यावेळी निरोप दिला मात्र त्याच्याकडे गांगुली यांनी कानाडोळा केला.  दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकला सौरव गांगुली न आल्यानं सचिनचा राग अनावर झाला. संतापलेल्या सचिननं गांगुली यांना करियर संपवण्याची धमकी दिली. 

तुला आता घरी पाठवून देणार असं चिडलेल्या सचिननं सौरव गांगुली यांना सांगितलं होतं. सचिनचा एवढा राग त्याने पहिल्यांचा पाहिला होता. सचिन तेंडुलकर क्रिकेटमधील देवमाणूस समजला जातो. भारतातच नाही तर जगभरात त्याचे फॅन आहेत. इतकच नाही तर आपल्या फलंदाजीने जगभरात त्याने राज्य केलं आहे.